EPFO Interest Rate : तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून पीएफचे पैसे कापले जात असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीचा आहे. सरकारकडून लवकरच पीएफ पैशावरील व्याजदर वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे पैसे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच पीएफमध्ये जमा होत असतील आता त्यांना त्यांच्या पैशावर अधिक व्याजदराचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे करोडो पीएफ कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

दोन दिवसीय सीबीटी बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पीएफ पैशावरील व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना या व्याजदर वाढीचा लाभ मिळणार आहे.
EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) च्या दोन दिवसीय बैठकीनंतर PF व्याजदरात 0.05 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. CBT च्या निर्णयानंतर, 2022-23 साठी EPF ठेवींवरील व्याजाचा दर अर्थ मंत्रालयाकडे संमतीसाठी पाठवला जाईल.
सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर, 2022-23 या वर्षासाठी EPFO मधील ठेवींवरील व्याज पाच कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पीएफ पैशावरील व्याजदर 8.10 टक्के होते. हे व्याजदर 1977-78 नंतर 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. आता पीएफचे व्याजदर 8.15 टक्के करण्यात आले आहे. १९७७-७८ मध्ये पीएफ पैशावरील व्याजदर ८ टक्के म्हणजेच सर्वात कमी होता.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीकडून २०२०-२१ साठी पीएफ पैशावरील व्याजदर 8.5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ७ कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांना 8.15 टक्के व्याज मिळणार आहे.
EPFO decides the rate of interest EPF for FY23. The rate of interest on EPF would be 8.15% for FY23. The labour ministry will send the proposal to the finance ministry for approval. pic.twitter.com/tPBqLgVTXm
— ANI (@ANI) March 28, 2023
मागील वर्षी हेच व्याजदर ८.१० टक्के होते. या व्याजदराने कर्मचाऱ्यांना २०२२-२३ मध्ये व्याजदर मिळत होते. मात्र आता कर्मचाऱ्यांना २०२३-२४ मध्ये ८.१५ टक्के व्याजदराने लाभ मिळणार आहेत.
या वर्षी EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या दोन दिवसीय बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यावरील पैशाचे व्याजदर ०.५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.