Best OTT Plans : आजकाल अनेकजण स्मार्टफोन वापरत असल्याने स्मार्ट टीव्ही सहसा कोणीही पाहत नाही. स्मार्टफोनवर सर्वकाही उपलब्ध असल्याने आता सर्वजण विविध ओटीटी प्लॅफॉर्म्सचा वापर करत आहेत. मात्र हे ओटीटी प्लॅफॉर्म्स वापरण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
मात्र तुम्हाला ओटीटी प्लॅफॉर्म्स साठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही कारण मोबाईल रिचार्जमध्येच तुम्हाला OTT प्लॅफॉर्म्स मोफत मिळत आहेत. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी अशा रिचार्ज योजना आणल्या आहेत.
फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही तर अनेक फायदेही या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळत आहेत. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएस सारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.
जिओ टेलिकॉम कंपनीकडून असे अनेक भन्नाट रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत ज्यामध्ये तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म्स मोफत दिले जात आहेत. चला तर जाणून घेऊया रिचार्ज प्लॅनबद्दल…
जिओचा 599 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे 1 वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. यासोबतच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS आणि दरमहा 100GB डेटा मिळत आहे.
जिओचा 999 रुपयांचा प्लॅन
Jio च्या OTT प्लान लिस्टमधील हा सर्वात महागडा प्लान आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे. हा देखील एक पोस्टपेड प्लॅन आहे जो 500GB रोलओव्हर डेटा आणि 200GB हाय स्पीड डेटा ऑफर करतो.
यामध्ये ग्राहकांना Amazon Prime Video, Netflix आणि Disney+ Hotstar चे 1 वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय तीन अतिरिक्त सिम कार्ड, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात येत आहे.
जिओचा 399 रुपयांचा प्लॅन
हा देखील जिओच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्म १ वर्षासाठी मोफत दिले जात आहे. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस आणि दरमहा 75GB डेटा मिळतो. नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे 1 वर्षासाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळते.