LIC Scheme : सरकारी विमा कंपनी LIC ने गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. तुम्हीही यामध्ये गुंतवणूक करून लखपती बनू शकता. अनेकजण मुलांच्या किंवा स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. LIC मधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
LIC ने गुंतवणूकदारांसाठी दरमहा 2500 रुपये गुंतवून मुदत पूर्ण झाल्यानंतर 9.50 लाख परतावा मिळण्याची योजना आणली आहे. या योजनेतून तुम्हाला कमाईची चांगली संधी आहे.

एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन आनंद आहे. कंपनीचा हा प्लान लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात अगदी कमी गुंतवणूक करूनही तुम्हाला प्रचंड परतावा मिळू शकतो. दुसरीकडे, पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी तुम्हाला काही झाले तर तुमच्या कुटुंबाला उर्वरित हप्ता भरण्याची गरज नाही.
या योजनेचा कालावधी २० वर्षाचा आहे. या योजनेत तुम्ही वर्षाचे ३० हजार रुपये गुंतवू शकता. याचा मासिक हफ्ता 2500 रुपये येईल. 5 लाख गुंतवल्यास तुम्हाला यावर ४.५ लाख रुपये मिळतील.
असाही होईल फायदा
LIC च्या जीवन आनंद योजनेवर, तुम्हाला रु. 9.5 लाख व्यतिरिक्त एकूण विमा रकमेवर 45/1000 चा रिव्हर्सल बोनस मिळेल. दरवर्षी तुम्हाला रिव्हर्सल बोनस अंतर्गत 22,500 रुपये मिळतील. याशिवाय, तुम्हाला रु. 10,000 चा अंतिम अतिरिक्त बोनस देखील मिळेल.
एलआयसीची ही पॉलिसी देशभरात खूप लोकप्रिय आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना ते खूप आवडते. तुम्हालाही एलआयसीच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासू शकता.