Fevicol : सर्वकाही चिटकवायला फेविकॉल वापरतात पण फेविकोल त्याच्याच बाटलीला का चिटकत नाही? जाणून घ्या रंजक उत्तर

Fevicol : तुम्ही अनेकदा शाळेमध्ये असताना किंवा ऑफिसमध्ये काही चिटकवण्यासाठी फेविकॉलचा वापर केला असेल. प्रत्येकजण चिटकवण्यासाठी फेविकॉलचा वापर करतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की फेविकॉल त्याच्या बाटलीला का चिटकत नाही.

अनेकवेळा तुम्ही पहिले असेल की एकदा चिटकवेलला फेविकॉल पुन्हा कधीही निघत नाही. त्याचा प्रभाव कधीही कमी होत नाही. आता फर्निचर चिटकवण्यासाठीही फेविकॉलचा वापर केला जातो.

फेविकॉल त्याच्या बाटलीला न चिटकण्यामागे एक कारण आहे. चला तर जाणून घेऊया यामागील रंजक कारण…

फेविकॉल म्हणजे काय?

पहिल्यांदा फेविकॉल कसा बनवला जातो आणि ते काय असते जाणून घेऊया. फेविकॉल हा रसायनांपासून बनवला जातो. त्या रसायनाला पॉलिमर असे म्हणतात. यापासून फेविकॉल बनवला जातो.

फेविकॉल कसे कामे करते?

फेविकॉल रसायनांपासून बनवले जाते. त्याचा कलर पांढरा असतो. फेविकॉल हा बाटलीमध्ये पॅक करून बाजारात विकायला पाठवला जातो. त्यातील रसायन त्याला कधीच कोरडे होऊ देत नाही.

फेविकॉलमध्ये पाण्याचा वापर केला जातो. ज्यावेळी फेविकॉलला हवा लागते तेव्हा तो सुकायला सुरुवात होते. त्यातील पाणी निघून गेल्याने ते घट्ट बनवायला सुरुवात होते. बाटलीमध्ये हवा लागत नसल्याने त्यातील पाणी आणि रसायन पातळ स्वरूपात राहते. त्यामुळे ते बाटलीला चिटकत नाही.

यामुळे फेविकॉल बाटलीला चिटक नाही

फेविकॉलमध्ये पाणी रसायन असल्याने ते सतत पातळ स्वरूपात राहते. ज्यावेळी फेविकॉलला हवा लागते तेव्हा त्यातील पाणी निघून जाते आणि फक्त रसायन राहते त्यामुळे कोणतेही वस्तू लगेच चिटकते.

बाटलीमध्ये हवा लागत नसल्याने ते सतत पातळ स्वरूपात राहते. जेव्हा तुम्ही बाटली उघडी करून ठेवाल तेव्हा बाटलीतला फेविकॉलही घट्ट बनायला सुरुवात होईल.