Flight Ticket : विमानाने प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण विमानाचे तिकीट जास्त असल्याने अनेकांची विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तुमचेही विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण एका ऑनलाईन वेबसाईटवर रेल्वेच्या खर्चात विमान तिकीट मिळत आहेत.
इतर देशात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी विमानाने प्रवास केला जातो. पण विमानाने प्रवास करण्यासाठी खूप पैसे खर्च होत असतात. त्यामुळे अनेकजण विमान प्रवास टाळत असतात आणि रेल्वेने प्रवास करतात.
अनेकजण रेल्वेने स्वस्तात आणि आरामदायी प्रवास होतो म्हणून हा प्रत्यय निवडत असतात. पण तुम्हाला सांगतो की तुमच्या रेल्वेच्या तिकिटामध्ये तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे. तर हो हे शक्य आहे. कारण एका वेबसाईटवर रेल्वे प्रवासाच्या पैशात विमानाचे तिकीट दिले जात आहे.
या वेबसाइटवर स्वस्त विमान तिकीट बुक करण्याची संधी दिली जात आहे
जर तुम्हीही स्वस्तात विमानाचा प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी skyscanner.co.in ही वेबसाईट महत्वाची आहे. कारण skyscanner.co.in या वेबसाईट वर तुम्हाला कमी दरात विमानाचे तिकीट दिले जात आहे.
skyscanner.co.in या वेबसाईट वर जाऊन तुम्ही सर्व विमानांची माहिती घेऊ शकता. या वेबसाइटवर अनेक प्रकारच्या फ्लाइट्स दाखवल्या जातात. या ठिकाणी तुम्हाला जिथून प्रवास करायचा आहे त्या ठिकाणचे विमान तुम्ही निवडू शकता.
ज्या दिवशी तुम्हाला प्रवास करायचा आहे तो दिवस सोडून तुम्ही फ्लाइट तिकीट बुक केल्यास, त्यांच्या किमती इतक्या कमी आहेत की तुम्ही फक्त ट्रेनच्या खर्चावर फ्लाइट तिकीट बुक करू शकता.
ही वेबसाइट कशी कार्य करते
ही वेबसाईट इतक्या स्वस्तात कशी विमानाची तिकिटे देत आहे असे अनेकांना वाटत असेल. पण ही वेबसाईट वेगवेगळ्या फ्लाइट शोधून तुमच्यासमोर आणते. या ठिकाणी अशा फ्लाइट्स दाखवल्या जातात ज्या सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त उपलब्ध आहेत.
जर तुम्हीही प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी स्कायस्कॅनर वेबसाइट तुम्हाला स्वस्तात तिकीट बुक करण्यास मदत करेल. यामुळे तुम्ही देखील स्वस्तात विमानाने प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकता.