iPhone 14 : भारतात ॲपल कंपनीच्या फोनचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच अनेकांचे ॲपल आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र कमी बजेट असल्याने फोन खरेदी करता येत नाही. कमी बजेट असणाऱ्यांसाठी फ्लिपकार्टने भन्नाट ऑफर आणली आहे.
फ्लिपकार्टवर तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जर तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच ती खरेदी करण्याची वेळ आहे.
iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. 80,000 रुपये किमतीचा फोन फक्त 42,155 रुपयांना खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्टवरील सर्व ऑफरचा फायदा घ्यावा लागेल.
आयफोन 14 सूट
iPhone 14 ची 128GB स्टोरेज असलेला फोनवर सूट मिळत आहे. मार्केटमध्ये हा फोन 79,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. मात्र फ्लिपकार्टवर ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 66,900 रुपयांना दिला जात आहे. या फोनवर 13,000 रुपयांची सवलत दिली जात आहे.
बँक ऑफर
तसेच या फोनवर बँक ऑफर देखील दिली जात आहे. फोन खरेदी करताना Axis Bank कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 5 टक्के सूट मिळेल. यामुळे फोनवर 3,345 रुपयांची सूट मिळेल. आता आयफोन १४ 69,900 रुपयांऐवजी 63,555 रुपयांना मिळेल.
एक्सचेंज ऑफर
जर तुमच्याकडे जुना आणि चांगल्या स्थितीत असलेला फोन असेल तर तो बदलून आयफोन १४ वर आणखी सूट मिळवू शकता. जर तुमचा जुना फोने चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला 21,400 रुपयांची सूट मिळेल. यानंतर तुम्हाला आयफोन १४ 42,155 रुपये किमतीला मिळेल.
Flipkart iPhone 14 Plus ऑफर
iPhone 14 सिरीजमध्ये समाविष्ट असलेला iPhone 14 Plus देखील फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह देण्यात येत आहे. येथे हा आयफोन 89,900 रुपयांऐवजी 75,999 रुपयांना देण्यात येत आहे. यावर बँक आणि एक्सचेंज ऑफरही दिल्या जात आहेत. Axis Bank कार्ड पेमेंटवर 5 टक्के सूट आहे, तर 21,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.