Citroen Car : आता विसरा मारुती सुझुकीची एर्टिगा! सिट्रॉन कंपनी लॉन्च करणार जबरदस्त 7 सीटर कार; जाणून घ्या सर्वोत्तम फीचर्स

Ahmednagarlive24 office
Updated:

Citroen Car : मारुती सुझुकी देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी ठरली असली तरी आता कंपनीच्या एर्टिगा कारला टक्कर देण्यासाठी सिट्रोएन कंपनीने बाजारात एक 7 सीटर कार आणली आहे जी लवकरच भारतीय बाजारपेठेत आणली जाऊ शकते.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात Citroen कंपनी देखील अनेक वाहने सादर करत आहे तसेच या कंपनीच्या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. Citroen कंपनीने नवीन 7 सीटर कार विकसित केली आहे. जी लवकरच भारतातील बाजारपेठेत येणार आहे.

Citroen कंपनीकडून या 7 सीटर कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारचा अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळणार आहे. ही कार एर्टिगालाही टक्कर असे अनेकांचे म्हणणे आहे.

सिट्रोएन बर्लिंगो

सिट्रोएन बर्लिंगो ही कार युरोपियन देशांमध्ये अगोदरच विकली जात आहे. सिट्रोएन बर्लिंगो ही कार 7 सीटर आहे. PSA च्या नवीन EMP2 आर्किटेक्चरवर विकसित केली गेली आहे. ज्यांच्या कुटुंब मोठे आहे त्यांच्यासाठी ही कार योग्य ठरणार आहे.

वैशिष्ट्ये

सिट्रोएन कंपनीकडून बर्लिंगो कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये तुम्हाला वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मोठी स्क्रीन, ऑटोमॅटिक एसी आणि मल्टीपल एअरबॅग्जसह अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

इंजिन

कंपनीकडून या कारला पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन सोबत 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 108 bhp ते 128 bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. Citroen Berlingo 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युरोपियन देशांमधील बाजारपेठेत जरी ही कार विकली जात असली तरी लवकरच भारतीय बाजारपेठ गाजवण्यासाठी कंपनीकडून सिट्रोएन बर्लिंगो ही कार लॉन्च केली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe