Free Flight Ticket : भारतात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे या दिवसांत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. उष्णता प्रचंड वाढते त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे अनेकजण पसंत करत असतात. रस्ते मार्गे, विमान, आणि रेल्वेने प्रवास करत असतात.
या दिवसांमध्ये विमान कंपन्या विमान तिकिटांचे दर वाढवत असतात. त्यामुळे विमान प्रवास करणे महागात पडते. या दिवसांत तुम्हालाही विमानाने प्रवास करायचा असेल तर तुम्ही देखील मोफत विमान प्रवास करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही माइल्स वापरू शकता
तुम्हाला विमानाने मोफत प्रवास करायचा असेल तर तुम्ही तो सहज करू शकता. यासाठी तुम्हाला काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. मोफत विमानाने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला रिवॉर्ड माइल्सचा योग्य वापर करावा लागेल.
फ्लाइट तिकीट बुक करताना मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स एका ठराविक संख्येपेक्षा जास्त झाल्यावर फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जे रिवॉर्ड पॉइंट्स रुपयांमध्ये ठेवले जातात त्यांना माइल्स म्हणतात. त्याच वेळी, माहितीनुसार, स्पाइसजेट एका रिवॉर्ड पॉइंटवर 50 पैसे देते.
रिवार्ड कसे गोळा करायचे
आता तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की हे रिवार्ड कसे मिळवायचे. तुम्हाला हे रिवार्ड मिळवायचे असतील तर त्यासाठी एअरलाइन्सच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये साइन अप करावे लागेल. हे केल्यानंतर, को-ब्रँडेड क्रेडिट कार्ट वापरा. अशा प्रकारे, तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळविण्यासाठी मदत होईल.
अशा एअरलाईन्सचा फायदा घ्या
या पॉइंट्सचा वापर तिकिटे खरेदी करण्यासाठी आणि एअरलाईन्समध्ये सेवा घेण्यासाठी केला जाऊ शकतो ज्या ऑनलाइन माध्यमातून रिवॉर्ड्सच्या बदल्यात रोख पैसे ऑफर करतात.
स्पाइसजेट एअरलाइन्स एका पॉइंटसाठी 50 पैसे देते. त्यानुसार, एका अंदाजानुसार, तुम्हाला 10000 पॉइंटसाठी 5000 रुपयांची तिकीट ऑफर मिळू शकते. मात्र, विमान कंपन्या यामध्ये काही बदलही करू शकतात.