Free Ration News : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून नागरिकांना कमी दरात धान्य दिले जाते. शिधापत्रिकेद्वारे गहू, तांदूळ आणि इतर वस्तू दिल्या जातात. पण कोरोना काळापासून देशातील नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे.
केंद्र सरकारच्या मोफत धान्य योजनेचा देशातील करोडो नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच २०२४ पर्यंत ही योजना सुरु ठेवणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता मोफत धान्य योजना बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारची मोफत रेशन योजना
कोरोना सारख्या महामारीमुळे नागरिकांचे संपूर्ण उद्योगधंदे बंद झाले होते. लॉकडाऊन असल्याने कोणालाही बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांचे रोजगार बंद पडले. अशा काळात ज्यांचे हातावर पोट होते त्यांचे जीवन हलाखीचे बनले होते.
त्यामुळे केंद्र सरकारकडून रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देशातील करोडो गरीब नागरिकांना याचा फायदा झाला. तसेच ही योजना २०२४ पर्यंत सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते.
लोकांना मोफत रेशनची सुविधा उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीकडून दिली जाते आणि ही सुविधा महिन्यातून दोनदा दिली जाते. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रति युनिट ५ किलो धान्य दिले जाते.
मात्र आता गरीब कल्याण योजनेंतर्गत या महिन्यात वितरित करण्यात येणाऱ्या रेशनला केंद्र सरकारने मंजुरी दिली नसल्याची बातमी समोर येत आहे. एक प्रकारे आपण असेही म्हणू शकतो की सरकारने आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही
मोफत धान्य योजनेचा कालावधी २०२४ पर्यंत केंद्र सरकारकडून वाढवण्यात आला आहे. उत्तरप्रदेश मधील नागरिकांना आता मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारकडून कोणताही आदेश न आल्याने लोकांना यावेळी मोफत रेशनचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच आता तुम्हाला सरकारकडून महिन्यातून एकदाच मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोफत रेशन सुविधा उपलब्ध होणार आहे.
या वृत्ताबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी अभिषेक कुरील यांनी कळविले आहे की, मोफत रेशनला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास त्याचा लाभ जनतेला मिळू शकेल, अन्यथा या वेळी केंद्र सरकारकडून मिळणारा मोफत रेशन लोकांना मिळू शकणार नाही.