Free Ration Update : रेशनकार्डधारकांसाठी मोठी अपडेट! 1 एप्रिल पासून तांदळाऐवजी दिली जाणार ही वस्तू; जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Free Ration Update : केंद्र सरकार आणि राज्य साकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी रेशनकार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरात गहू, तांदूळ आणि इतर गोष्टींचे वाटप केले जाते.

तसेच कोरोना काळात देशभरातील सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांना खायचे खूप हाल होत होते. गरीब नागरिकांचे कमाईचे साधन बंद झाल्याने केंद्र सरकारकडून मोफत रेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच २०२४ पर्यंत देशातील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

आता उत्तराखंड साकारकडून रेशन बाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. रेशनकार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. रेशन द्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये सरकारकडून बदल केला जाणारा आहे.

तांदळाऐवजी हे साहित्य मिळणार आहे

सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरामध्ये गहू आणि तांदूळ देण्यात येते. तसेच आणखी देखील वस्तू मोफत दिल्या जात आहेत. सामान्य तांदळाऐवजी सरकारकडून आता फोर्टिफाइड तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे सामान्य वर्गातील लोकांना दर्जेदार अन्न मिळत नसल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. पुरेशा पोषक तत्वांचा अभाव असल्याने अनेकजण आजरी पडत आहे. त्यामुळे सरकारकडून सामान्य तांदळाऐवजी फोर्टिफाइड तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोर्टिफाइड तांदूळ हा सामान्य तांदळापेक्षा पोषक असतो. त्यामुळे या तांदळातुन सामान्य नागरिकांना चांगले पोषक तत्वे मिळतील असा सरकारचा मानस आहे. त्यामुळे लवकरच फोर्टिफाइड तांदूळ दिले जाऊ शकते.

गेल्या वर्षी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला

गेल्या वर्षी ही योजना उत्तराखंडच्या हरिद्वार आणि यूएसनगरमध्ये सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू केली होती आणि एप्रिलपासून ही योजना संपूर्ण उत्तराखंडमध्ये सुरू केली जाईल.

सरकारकडून ही योजना सुरु केल्यानंतर 23 लाख शिधापत्रिकाधारकांना सामान्य तांदळाऐवजी फोर्टिफाइड तांदूळ मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe