Free Ration Update : देशातील केंद्र सरकारकडून रेशनकार्ड बाबत अनेक नियम आणले जात आहेत. तसेच दिवसेंदिवस त्या नियमांमध्ये बदल देखील केले जात आहेत. आता सरकारकडून पुन्हा एकदा रेशनकार्ड धारकांसाठी मोठे अपडेट दिले आहे.
केंद्र सरकारकडून कोरोना काळापासून देशातील करोडो रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच मोफत रेशन योजेनची मुदत वाढवून २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना चांगला फायदा होत आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच रेशन कार्डवरील धान्य वाटपामध्ये बदल केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उत्तराखंड सरकारने रेशनमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना फायदा होणार आहे.
सामान्य तांदळाऐवजी मिळणार हे साहित्य
उत्तराखंड सरकारच्या मोफत रेशन योजनेंतर्गत उपलब्ध अन्नपदार्थांमध्ये तांदळाचाही समावेश आहे, जे सरकारकडून लोकांना वाटले जाते, परंतु उत्तराखंड सरकारने आता सामान्य तांदळाऐवजी फोर्टिफाइड तांदूळ मोफत रेशनमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता नागरिकांना उच्च दर्जाचा तांदूळ मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, भारतातील खालच्या वर्गातील लोकांना योग्य आणि दर्जेदार अन्न न मिळाल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
WHO चे म्हणणे आहे की या आजारांचे मूळ कारण आहे ते पुरेसे पोषक अन्न न मिळणे. पोषक अन्न मिळत नसल्याने देशातील अनेक नागरिक आजरी पडत आहे. त्यामुळे सरकारकडून सामान्य तांदळाऐवजी चांगल्या प्रतीचा फोर्टिफाइड तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य तांदळापेक्षा फोर्टिफाइड तांदूळ हा अधिक पौष्टिक असतो. त्यामुळे सरकारकडून रेशनच्या सामान्य तांदळाला हद्दपार करून फोर्टिफाइड तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व नागरिकांना पोषक अन्न मिळावे कोणीही उपाशी राहू नये हा यामागचा उद्देश आहे.
सरकारकडून रेशन कार्डधारकांना एप्रिल महिन्यापासून हा चांगल्या प्रतीचा फोर्टिफाइड तांदूळ दिला जाणार आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा तांदूळ मिळणार आहे.
गेल्या वर्षी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला
उत्तराखंड सरकारने राज्यात पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रतीचा फोर्टिफाइड तांदूळ दिला जाणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर उत्तराखंडमधील सुमारे 23 लाख शिधापत्रिकाधारकांना सामान्य तांदूळऐवजी फोर्टिफाइड तांदूळ दिला जाणार आहे.