Free Smartphone Scheme : आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन पाहायला मिळत आहेत. तसेच जुन्या फोनची जागा आता स्मार्टफोनने घेतल्याने ते हद्दपार होईल लागले आहेत. मात्र आता सरकारकडून महिलांना मोफत स्मार्टफोन वाटप केले जाणार आहेत.
सरकारकडून मोफत स्मार्टफोन वाटप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सरकारकडून महिलांना मोफत स्मार्टफोन वाटप केले जाणारा आहेत. त्यामुळे आता महिलांना देखील स्मार्टफोन वापरण्याची संधी मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोफत मोबाईल वाटप योजेनची चर्चा सुरु आहे. तसेच या योजनेअंतर्गत महिलांना मोफत मोबाईल मिळणार की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. मात्र आता सरकारकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
सरकारकडून मोफत मोबाईल वाटप योजनेअंतर्गत ४० लाख महिलांना मोफत स्मार्टफोन वाटप केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १.३५ कोटी कुटुंबातील महिला प्रमुखांना मोबाईलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या दिवसापासून मोफत मोबाईल वाटप सुरू होणार आहे
राजस्थान सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. सरकारकडून राज्यातील महिलांना टप्प्याटप्प्यामध्ये स्मार्टफोन वाटप केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 40 लाख चिरंजीवी महिला प्रमुखांना मोफत स्मार्टफोन वितरित केले जातील.
30 ऑगस्ट 2023 म्हणजेच रक्षाबंधनापासून महिलांना मोबाईल वाटप केले जाणार आहेत. रक्षाबंधनादिवशी महिलांना मोफत मोबाईल वाटप करण्याचा पहिला टप्पा सुरु केला जाणार आहे.
मोफत मोबाईलसह 3 वर्षांसाठी मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि मेसेज उपलब्ध असतील
राजस्थान सरकारच्या या मोफत मोबाईल वाटप योजनेचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. या स्मार्टफोनची बाजारातील किंमत 9 ते 10 हजार रुपयांच्या आसपास असणार आहे.
महिलांना केवळ मोफत मोबाईलच नाही तर त्यासोबत ३ वर्षांसाठी मोफत इंटरनेट देण्यात येणार आहे. तसेच कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधाही देण्यात येणार आहे. राजस्थानमधील १.३५ कोटी महिलांना ३ वर्षांसाठी इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंगचा मोफत लाभ मिळणार आहे.