Gas Cylinder Price : सरकारचा मोठा निर्णय! आता फक्त ५०० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर, अशी करा नोंदणी

Ahmednagarlive24 office
Published:

Gas Cylinder Price : देशात दिवसेंदिवस महागाई आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या देखील किमती खूपच वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ बसत आहे. पण आता सरकारकडून गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गॅस सिलिंडरच्या किमती अधिक वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर खरेदी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सरकारकडून सर्वसामान्यांचा विचार करत आता गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गॅस सिलिंडरच्या किमती अधिक वाढल्या असल्याने देशातील अनेक गरीब कुटुंबाना गॅस सिलिंडर खरेदी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी गॅस सिलिंडर खरेदी करणे बंद केले आहे. मात्र आता फक्त ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे.

आता सरकारकडून सर्व सर्व बीपीएल आणि उज्ज्वला योजनेच्या गॅस कनेक्शनधारकांना सरकारकडून फक्त ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

आता फक्त ५०० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर

राजस्थान सरकारकडून आता नागरिकांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची योजना लागू केली आहे. आता राजस्थान सरकार राज्यातील सर्व BPL आणि उज्ज्वला योजना गॅस कनेक्शन धारकांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देणार आहे.

राजस्थान सरकारकडून गॅस सिलिंडर कमी दरात देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ पासून सरकारकडून ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जर ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडरचा हवा असेल तर त्यासाठी सरकारच्या नियमानुसार तुम्हाला नोंदणी करायला लगेल. सरकारकडून 24 एप्रिल 2023 पासून राज्यात सरकारद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या महागाई मदत शिबिरांमध्ये स्वतःची नोंदणी करू शकतात.

केंद्र सरकारची बीपीएल उज्ज्वला योजना

मोदी सरकारकडून २०१६ मध्ये उज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांना मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe