Hindenburg Effect : म्हणतात ना की फुग्यांमध्ये जास्त हवा झाली की फुगा फुटतो. तसेच काहीतरी उद्योगपती आणि जगातील टॉप ३ श्रीमंतांच्या यादीत असणारे गौतम अदानी यांच्यासोबत झाले आहे. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचा खूप बोलबाला होता मात्र आता गौतम अदानी यांच्या संपत्तीत खूप घट झाली आहे.
काही दिवसांपूर्वी अदानी समूहाची जगामध्ये चर्चा होती. मात्र आता संपत्तीमध्ये झालेल्या कमीची चर्चा आता सर्वत्र आहे. अदानी यांची एकूण घटलेल्या संपत्तीचा आकडा जर पाहिला तर तुमचेही डोळे चक्रावून जातील.
अब्जाधीश गौतम अदानी यांची निव्वळ संपत्ती सोमवारी $50 अब्जच्या खाली गेली आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 120 अब्ज होती. तसेच ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती होते.
मात्र एक अहवाल आला आणि अदानी यांच्या संपूर्ण श्रीमंतीला जणू साडेसातीच लागली. दिवसेंदिवस अदानी यांच्या संपत्तीमध्ये घट होत चालली आहे. जणू अडाणी यांच्या श्रीमंतीला उतरती कळाच लागली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अदानी समूहाची शेअर बाजारात तोट्याची बाजू सुरू झाली जेव्हा यूएस-स्थित शॉर्ट सेलर फर्म, हिंडेनबर्ग रिसर्चने समूहाबद्दल स्फोटक अहवाल सादर केला. या अहवालात समूहाच्या वाढत्या कर्जाबद्दल आणि कथित स्टॉक फेरफार आणि इतर गोष्टींबरोबरच टॅक्स हेव्हन्सचा अनियमित वापर याबद्दल चिंता व्यक्त केली.
तर अदानी समूहाने हिंडेनबर्ग यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. या अहवालाने गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, परिणामी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे.
गौतम अदानींवर मोठा प्रभाव
अडाणी हे हिंडेनबर्गचा अहवाल येण्याअगोदर जगातले तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र जेव्हा हिंडेनबर्गचा अहवाल आला तेव्हापासून अडाणी हे श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडत गेले आणि आता सध्या ते 500 श्रीमंत व्यक्तीच्या यादीत गेले आहेत.
हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यापासून अडाणी यांच्या संपत्तीत झपाट्याने घसरण होत आहे. अदानी हे देशातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या देखील संपत्तीच्या बाबतीत पुढे होते. आता त्याच्याही खाली अदानी गेले आहेत.