Solar Stove : वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतीपासून मिळेल सुटका! बाजारात आला नवीन सोलर स्टोव्ह, किंमतही खूपच कमी

Published on -

Solar Stove : देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. तसेच सर्वसामान्यांना वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे अन्न शिजवणे देखील महाग झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा वाढत चालला आहे. मात्र आता सर्वसामान्यांची गॅस सिलिंडर खरेदी करण्यापासून सुटका होईल.

आता गॅस सिलिंडर खरेदी न करता सर्वसामान्यांचे अन्न शिजवले जाऊ शकते. हो हे खरं आहे. कारण बाजारात एक सोलर स्टोव्ह आला आहे. तो खरेदी केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलिंडरची गरज नाही. तसेच कोणतेही इतर पैसे खर्च करण्याची गरज नाही.

जर तुम्हाला तुमचे गॅस सिलिंडरसाठी खर्च केले जाणारे पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला सोलर स्टोव्ह खरेदी करावा लागेल. यामध्ये फक्त एकदाच पैसे खर्च करावे लागतील आणि तिथून पुढे तुम्हाला सतत मोफत अन्न शिजवता येईल.

दरमहा हजारो रुपयांची होणार बचत

सध्या उपलब्ध असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीची सोलर स्टोव्हशी तुलना केल्यास हे आकडे समोर येतात की जर तुम्ही पहिले व्हेरियंट खरेदी केले तर तुम्हाला 1 वर्षाच्या आत नफा मिळू लागेल आणि दुसरीकडे, जर तुम्ही दुसरे व्हेरियंट खरेदी केले तर तुम्हाला २५ महिन्यांनंतर नफा मिळू लागेल.

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या घरात गॅस सिलिंडर वापरत असाल आणि तो 1 महिना चालला तर, त्यानुसार, जर तुम्हाला 12 महिन्यांची किंमत 1000 रुपयांनुसार केली तर तुम्हाला सुमारे 12000 रुपये खर्च करावे लागतील. 10 वर्षांसाठी तुम्हाला 120,000 रुपये खर्च करावे लागतील.

तुम्ही सोलर स्टोव्ह कधी खरेदी करू शकाल

सोलर स्टोव्हची सध्या एंक कंपन्यांनी चाचणी सुरु केली आहे. यासाठी सरकारही तत्परतेने काम करत आहे. पुढील १ ते २ वर्षात सोलर स्टोव्ह सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे.

सोलर स्टोव्हची किंमत

सध्या तुम्ही गॅस सिलिंडर वापरत असाल तर तुम्हाला १००० रुपयांपेक्षा जास्त पैसे खरेदी करावे लागत आहेत. मात्र जर तुम्ही पुढील भविष्यात तुम्ही सोलर स्टोव्ह खरेदी केला तर तुमच्या पैशांची मोठी बचत होईल. सोलर स्टोव्ह ची बाजारात किंमत 12000 ते 14000 रुपयांच्या आसपास असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News