अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कॅनरा बँकेने 2 कोटींच्या खालील ठेवीवरील व्याज दरात बदल केला आहे. कॅनरा बँकेने फिक्स्ड 2 वर्ष ते 10 वर्षांच्या ठेवीवरील व्याज दरात वाढ केली आहे.
त्याच वेळी, बँकेने 1 वर्षात मॅच्युरिंग ठेवींवरील व्याज कमी केले आहे. कॅनरा बँकेचे नवीन एफडी व्याज दर 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होतील. यापूर्वी बॅंकेने 16 नोव्हेंबर 2020 रोजी एफडीवरील व्याज दरात सुधारणा केली होती. या दुरुस्तीनंतर कॅनरा बँक मुदत ठेवींसाठी 7-45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी 2.95% व्याज दर देईल. मॅच्युरिटी कालावधी 46-90 दिवस, 91 दिवस ते 179 दिवस आणि 1 वर्षापासून 180 दिवसांचा व्याज दर अनुक्रमे 3.9 टक्के, 4 टक्के आणि 4.45 टक्के असेल.
1 वर्षाच्या एफडी मॅच्युरिंगवरील व्याज दरात इतकी कपात –
एका वर्षात मॅच्युर एफडीसाठी बँकेने व्याज दरात 5 बेसिस पॉईंट (बीपीएस) घट केली आहे. आता या एफडीवरील व्याज दर 5.20 टक्के असेल. 2 वर्षांपेक्षा कमी व एका वर्षाच्या मुदतीच्या ठेवींसाठी बँक 5.20% व्याज देईल. 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या एफडीसाठी बँक 5.40 टक्के व्याज देईल आणि 3 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सरकारी बँक आता 5.50 टक्के व्याज देईल.
- कॅनरा बँक एफडीचे नवीन व्याज दर (दोन कोटींपेक्षा कमी) –
– 7 दिवस ते 45 दिवस – 2.95%
– 46 दिवस ते 90 दिवस – 3.90%
– 91 दिवस ते 179 दिवस – 4%
– 180 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी – 4.45%
– 1 वर्ष केवळ -5.20%
– 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी – 5.20%
– 2 वर्षे किंवा अधिक आणि 3 वर्षांपेक्षा कमी – 5.40%
– 3 वर्षे किंवा अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी -5.50%
– 5 वर्षे किंवा अधिक आणि 10 वर्षे – 5.50%
ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज –
या दुरुस्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते दहा वर्षे मुदतीच्या एफडीचा व्याज दर 2.9 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत राहील. 180 दिवस ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना कॅनरा बँक सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज देते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2021, all rights reserved