Gold Price Today : सोने 3200 रुपयांनी स्वस्त! आता 33000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 10 ग्रॅम सोने; पहा आजचे नवीन दर

Ahmednagarlive24 office
Published:

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या किमती खूपच वाढल्या होत्या. त्यामुळे अनेकांना ते घेणे परवडत नव्हते. मात्र सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार स्वस्त दरात सोने आणि चांदी खरेदी करू शकतात.

या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार सोने 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे तर चांदी दरात २ रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या सोने 55700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62000 रुपये प्रति किलो मिळत आहे.

या आठवड्यातील सोन्याचे दर कसे होते

सोमवारी सोने 14 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 56089 रुपये प्रति किलोवर बंद झाले.
बुधवारी सोने 844 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 55245 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.
गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 41 रुपयांनी महागला आणि 55286 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.
शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 383 रुपयांनी महागले आणि 55669 रुपये प्रति किलोवर बंद झाले.

लवकरच देशात लग्नसराई सुरु होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे दरही वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे.

नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

शुक्रवारी सोन्याचे दर वाढल्यानंतर २४ कॅरेट सोने 383 रुपयांनी महाग होऊन 55669 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 381 रुपयांनी महागून 55446 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 356 रुपयांनी महाग होऊन 50993 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 287 रुपयांनी महाग होऊन 41752 रुपये झाले, 14 कॅरेट सोने 224 रुपये महाग होऊन 32566 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

अशी जाणून घ्या सोने चांदीची शुद्धता

जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्यास जात असाल तर सर्वात प्रथम त्याची शुद्धता जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. याद्वारे ग्राहक सोने आणि चांदीची शुद्धता तपासू शकतात. तसेच हॉलमार्क पाहूनच सोने आणि चांदी खरेदी केली पाहिजे.

सोने 3200 रुपयांनी तर चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे

सोने आणि चांदीचे दर खूपच वाढले होते मात्र सध्या सोने आणि चांदी स्वस्त दरात मिळत आहे. सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापासून 3213 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे तर चांदी 18189 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe