Gold-Silver Rate today: दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार आहे का? अगोदर सोन्याचे आणि चांदीचे दर वाचा मग घ्या निर्णय

Published on -

Gold-Silver Rate today:- सध्या सणासुदीचे दिवस असून दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सारख्या सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन मानाचा मुहूर्त साधून अनेक व्यक्ती सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून देखील सोने-चांदीची खरेदी करण्याला पसंती दिली जाते.

परंतु गेल्या काही दिवसांपासून जर आपण सोने-चांदीचे दर पाहिले तर यामध्ये घसरण कमी परंतु वाढीचा आलेखच जास्त दिसून येत आहे. यामागे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत असून प्रामुख्याने युद्धजन्य परिस्थिती मुळे दर वाढण्याचे सध्या चित्र आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरात घसरण झालेली होती. परंतु काल मात्र त्यामध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. जर आपण ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे दोन दिवस व नोव्हेंबरच्या एक तारखेचा विचार केला तर या तीनच दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1020 रुपयांची घसरण झालेली होती म्हणजे 1020 रुपयांनी सोन स्वस्त झालं होतं.

परंतु दोन तारखेला परत त्यामध्ये एकशे दहा रुपयांची वाढ झाली. तीच गत चांदीची देखील असून गेल्या आठवड्यामध्ये चांदीच्या दरामध्ये बाराशे रुपयांची घसरण झाली व दोन तारखेला परत चांदीने सातशे रुपयांची उच्चांकी वाढ नोंदवली. या अनुषंगाने आपण सोने आणि चांदीचे आजचे बाजार भाव काय होते याबद्दल माहिती घेऊ.

सोन्याचे आजचे बाजार भाव ( 3 नोव्हेंबर 2023) अ)- 22 कॅरेट सोन्याचे दर- 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर पाहिला तर तो आज 5675 रुपये होता. काल हाच दर 5,665 रुपये होता म्हणजेच कालच्या तुलनेत आज त्यामध्ये दहा रुपयाची वाढ झाली. याच आकडेवारीवरून आपल्या लक्षात येते की दहा ग्रॅम 22 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी आज 56 हजार 750 रुपये मोजावे लागतील.

आ)- 24 कॅरेट सोन्याचे दर- 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे दर 6190 आहेत. कालचा विचार केला तर एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6,179 रुपये प्रति ग्राम होता.म्हणजेच कालच्या तुलनेत आज अकरा रुपयांची वाढ झाली. याच आकडेवारीवरून दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर आज 61 हजार 900 रुपये आहे तर काल 61,790 इतका होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज एक तोळा सोन्या मागे 110 रुपयांची वाढ झाली.

इ)- 18 कॅरेट सोन्याचे बाजारभाव- १८ कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा आजचा बाजार भाव पाहिला तर तो 4643 रुपये इतका होता. काल 18 कॅरेटच्या एक ग्राम सोन्याचा भाव 4635 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज 8.20 रुपयांची वाढ झाली.

याच हिशोबाने जर आपण दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा 18 कॅरेट सोन्याचा भाव पाहिला तर तो 46 हजार 432 रुपये आहे. काल एक तोळ्याचा भाव 46 हजार 350 रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज तब्बल 82 रुपयांची तोळ्यामागे वाढ झाली.

चांदीचा दर काय होता?-  गेल्या आठवड्यामध्ये चांदीत 1200 रुपयांची घसरण झालेली होती. म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी 300 रुपयांची तर एक नोव्हेंबर रोजी बाराशे रुपयांची घसरण चांदीत झाली. परंतु दोन तारखेला परत चांदीने सातशे रुपयांची उसळी घेतली. आज जर चांदीचा बाजार भाव पाहिला तर तो एक किलोला 71 हजार 684 रुपये झालेला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News