Gold-Silver Rates Today : भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक सोन्याच्या दराने गाठला आहे. आज सोन्याचा भाव 61,360 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.
सोन्याच्या दराचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे. तसेच चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीची किंमत 77,090 रुपये प्रति किलोच्या आसपास सुरु आहे. यावरून तुम्ही महागाई किती वाढली आहे याचा अंदाज लावू शकता.

किती झाली वाढ
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 1030 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,360 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 950 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. तसेच चांदीच्या दरात वाढ होऊन चांदी 77,090 रुपये प्रति किलो मिळत आहे.
IBJA वर किंमत काय आहे?
IBJA वर आज 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 60781 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आली आहे. 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 60,538 रुपये प्रति 10 ग्रॅम, 916 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 55,675 रुपये प्रति 10 ग्रॅम, 750 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 45,586 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि सोन्याचा भाव 585 रुपये आहे. ५८५ शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 35,557 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
| Gold Purity | Rate as per 10 Grams |
|---|---|
| 99.9 Purity (24 Carat) | Rs. 60,781 |
| 91.6 Purity (22 Carat) | Rs. 55,675 |
| 75.0 Purity (18 Carat) | Rs. 45,586 |
शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क
सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला शुद्धता जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही घेतलेल्या दागिन्यांवर 916 लिहिले असेल तर ते 22 कॅरेट सोने आहे. तसेच त्यावर 750 असे लिहिले असेल तर ते 11 कॅरेट सोन्याचे दागिने आहे. तसेच, जर 585 लिहिले असेल तर समजून घ्या की तुमचे दागिने 14 कॅरेट सोन्याचे आहेत.
मुख्य शहरातील सोन्या चांदीचे दर
| City | 22K Gold in Rupees | 24K Gold in Rupees | Silver in Rupees |
|---|---|---|---|
| चेन्नई | 56,900 | 62,070 | 80,700 |
| मुंबई | 56,250 | 61,360 | 77,090 |
| दिल्ली | 56,400 | 61,510 | 77,090 |
| कोलकाता | 56,250 | 61,360 | 77,090 |
| बेंगलुरु | 56,300 | 61,410 | 80,700 |
| हैदराबाद | 56,250 | 61,360 | 80,700 |
| पुणे | 56,250 | 61,360 | 77,090 |
| अहमदाबाद | 56,300 | 61,410 | 77,090 |
| सूरत | 56,300 | 61,410 | 77,090 |
| जयपुर | 56,400 | 61,510 | 77,090 |
| लखनऊ | 56,400 | 61,510 | 77,090 |
| पटना | 56,300 | 61,410 | 77,090 |
| नागपुर | 56,250 | 61,360 | 77,090 |
| चंडीगढ़ | 56,400 | 61,510 | 77,090 |
| भुवनेश्वर | 56,250 | 61,360 | 80,700 |
| गुड़गांव | 56,400 | 61,510 | 77,090 |
| गाजियाबाद | 56,400 | 61,510 | 77,090 |
| नोएडा | 56,400 | 61,510 | 77,090 |













