PMKVY Online Registration : बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! नोकरीसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण आणि 8 हजार रुपये, असा करा अर्ज

Published on -

PMKVY Online Registration : कोरोना काळापासून अनेक तरुणांची नोकरी गेली आहे. तसेच उद्योगधंद्यांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. देशात अनेक तरुण बेरोजगार आहेत. तसेच अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशा तरुणांसाठी मोदी सरकारकडून नोकरीची संधी दिली जात आहे.

केंद्र सरकारकडून PM कौशल विकास योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना बेरोजगार तरुणांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याचा आहे. या योजनेचे एकूण ३ टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. आता या योजनेचे चौथे पर्व सुरु झाले आहे.

PMKVY 4.0 असे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून तरुणांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. या योजनेत तरुणांना मोफत प्रशिक्षण आणि ८ हजार रुपये देखील दिले जात आहे.

ऑनलाइन नोंदणी 2023

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकार प्रधानमंत्री कौशल विकास योजनेद्वारे तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे.

मोफत प्रशिक्षणासोबतच निवास, भोजन आणि ₹ 8000 चे मासिक आर्थिक सहाय्य देखील दिले जाईल. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर लवकरच PMKVY 4.0 ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सरकारकडून सुरू केली जाईल.

PMKVY 4.0 ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया?

PMKVY 4.0 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम PM कौशल विकास योजना (PMKVY) च्या पोर्टलवर जावे लागेल.

मुख्यपृष्ठावर, तुम्हाला PMKVY 4.0 ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.

PMKVY 4.0 नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि “सबमिट” वर क्लिक करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News