PM Free Solar Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांमधून आर्थिक मदत देखील केली जात आहे.
केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना सुरू करण्यात आली आहे.
तसेच आता प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेसाठी अर्ज मागण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हालाही मोफत प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ घेईचा असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता. या योजनेतून तुम्हाला मोफत सौर पॅनेल मिळेल.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान सौर पॅनेल योजना सुरु करण्यात आली आहे. शेतीच्या सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जात आहे.
अनेक राज्यांमध्ये पंतप्रधान सौर पॅनेल योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात 2 लाख सौर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सौर पंपासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड.
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
शेतीची कागदपत्रे
बँक खाते पासबुक.
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजनेसाठी अर्ज कसा करावा?
जर तुम्हीही शेतकरी असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. शेतीच्या सिचंनासाठी केंद्र सरकारने सौर पॅनेल योजनेवर ९० टक्के अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी आता सौर पॅनेलद्वारे शेतीसाठी सिंचन करू शकतात.
प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेअंतर्गत फक्त काही राज्यांमध्ये अर्ज सुरू झाले आहेत. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाब या राज्यांमध्ये, राज्य सरकारने सौर पंपांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.