Indian Railways ATVM : रेल्वेचा प्रवास हा अतिशय आरामदायी आणि कमी खर्चिक आहे. त्यामुळे अनेकजण खाजगी वाहनांऐवजी रेल्वेने प्रवास करण्याला पहिली पसंती देतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत वेगवगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते.
परंतु, याची काही जणांना माहिती असते तर काहीजणांना या सुविधेबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतात. अशातच आता रेल्वेने आपल्या करोडो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांची रेल्वे आता कधीही चुकणार नाही.
प्रवाशांना आता मशीनला मिळणार तिकीट
रेल्वे विभागाने आपल्या प्रवाशांना नवीन भेट म्हणून, देशातील काही रेल्वे स्थानकांवर नवीन ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम) बसवण्यात येणार आहे. रेल्वे विभागाच्या या निर्णयाचा फायदा दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना होणार आहे. या विशेष मशिन्सच्या मदतीने प्रवाशांना आता तिकीट लवकर मिळणार असून आता स्थानकांवर तिकिटांसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा हळूहळू कमी होऊन संपतील.
या ठिकाणी बसविण्यात येणार एटीव्हीएम मशीन
याबाबत अधिक सांगायचे झाले तर सध्या दक्षिण रेल्वे विभागात ९९ एटीव्हीएम मशीन कार्यरत असून आता दक्षिण रेल्वे विभागांनी बऱ्याच रेल्वे स्थानकांवर २५४ जास्त एटीव्हीएम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर एकूण 6 विभागात 254 एटीव्हीएम मशीन बसवले जाणार आहे. यात चेन्नई विभागात (96), तिरुचिरापल्ली विभागात (12), मदुराई विभागात (46), तिरुवनंतपुरम विभागात (50), पलक्कड विभागात (38), सालेम विभागात (12) एटीव्हीएम मशीन बसवले जाणार आहे.
कोणाला होणार जास्त फायदा?
याचा फायदा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. या विशेष मशिनमधून प्लॅटफॉर्म तिकीट तसेच कमी अंतराच्या प्रवासाची तिकिटे त्वरित जारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्थापनेमुळे, रेल्वे स्थानकांवर अनारक्षित तिकीट काउंटरवरील कामाचा भार कमी होईल. रेल्वेचा हा विशेष उपक्रम पूर्णपणे प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास आहे.