7th Pay Commission Breaking : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची १ मार्च २०२३ रोजी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये DA वाढीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
देशातील ४७ लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि ६८ लाख पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत चर्चा झाली आहे.
मात्र अजूनही केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर कोणतीही पत्रकार परिषद घेण्यात आली नाही किंवा कोणतेही परिपत्रक देण्यात आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना गोड बातमी देऊ शकतात. DA वाढीबाबत होळीपूर्वी मोदी सरकार घोषणा मोठी घोषणा करू शकते. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढीस प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या DA ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के होणार आहे.
कर्मचाऱ्यांना ही DA वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे. तसेच पेन्शनधारकांनाही १ जानेवारीपासून वाढीव पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोन वेळा वाढवण्यात येतो. मात्र केंद्र सरकारकडून २०२३ मध्ये एकदाही DA वाढवण्यात आला नाही. त्यामुळे लाखो कर्मचारी DA वाढीची वाट पाहत आहेत. दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
दिवाळीपूर्वी 28 सप्टेंबर 2022 रोजी शेवटची DA सुधारणा करण्यात आली होती. ते 1 जुलै 2022 पासून लागू मानले जात होते. त्यानंतर त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तेव्हा डीए ३४ टक्के होता, तो वाढवून ३८ टक्के करण्यात आला. त्यातच पुन्हा एकदा ४ टक्के वाढीची माहिती समोर आली आहे.