Sharad Pawar Gram samrudhi Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गाय-गोठ्यासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान; असा करा अर्ज

Ahilyanagarlive24 office
Published:

Sharad Pawar Gram samrudhi Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे. आता अशाच एक योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन आणि गाय-गोठ्यासाठी शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचा तुम्हीही फायदा घेऊन नवीन गाय-गोठा किंवा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु करू शकता.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय महत्वाचा ठरत आहे. शेतकऱ्यांना या व्यवसायातून आर्थिक मदत देखील मिळत आहे. तसेच अशा व्यवसायाला प्रोत्साहन म्हणून सरकारकडून अनुदान दिले जात आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचा फायदा घेऊन शेतकरी गाय-गोठा तयार करू शकतात.

3 फेब्रुवारी पासून शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना गाय-गोठ्यासाठी अनुदान देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक चालना देण्यासाठी ही योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शेती अवजारे, सिंचन आणि पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावर सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सरकारकडून हे अनुदान दिले जात आहे. अधिकाधिक शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळावे यासाठी सरकारने ही योजना आखली आहे.

जे शेतकरी नव्याने दुग्धव्यवसाय सुरु करणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागणार आहे. शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe