शेतकऱ्यांसाठी खुशखबर…कांदा निर्यातीवरील बंदी उठवली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-गेल्या काही महिन्यांपूर्वी कांदा निर्यातवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. दरम्यान आता बळीराजासाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नवं वर्षाचं गिफ्ट दिले आहे. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली असून, केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

शेतकऱ्यांकडे आता किती कांदा उपलब्ध आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. कांद्याच्या निर्यातीवर केंद्रानं बंदी घातली होती. अखेर ती बंदी उठवण्यात आलीय. 1 जानेवारी 2021 नंतर कांद्यावर कोणतीही बंदी असणार नाही.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी टीकास्त्र सोडले होते. अखेर केंद्रानं हा निर्णय मागे घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती.

केंद्रानं हा निर्णय 23 ऑक्टोबरला घेतला होता. सरकारनं किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. किरकोळ व्यापारी 2 टन कांदा साठवू शकतात, तर ठोक व्यापारी 25 टनांपर्यंत कांदा साठवून ठेवू शकतात, अशासुद्धा अटी घातल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment