EPFO Higher Pension : सरकारी नोकरदार असो वा खासगी नोकरदार आता सर्वांना पेन्शन मिळणे शक्य झाले आहे. जर तुमचेही EPFO मध्ये पगारातून काही रक्कम पेन्शनसाठी कापली जात असेल तर तुम्हालाही निवृत्तीनंतर दरमहा सरकारी नोकरदारांसारखी पेन्शन मिळेल.
कर्मचारी भविष्य निधी संघटना या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी नोंदणी केली आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण EPFO कडून आता वाढीव पेन्शन दिली जाणार आहे. तसेच यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2023 देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची लिंक सुरु
EPFO कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ३ मे अगोदर अधिक पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2022 मध्ये EPS 1995 अंतर्गत उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली होती. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी राजीनामा दिलेल्या EPS 1995 सहभागींसाठी उच्च पेन्शन निवडण्यासाठी अर्जाची विंडो 4 मार्च 2023 रोजी बंद करण्यात आली होती.
EPFO ने सांगितले की त्यांनी पात्र पेन्शनधारकांना युनिफाइड पोर्टलद्वारे आवश्यक कागदपत्रांसह EPFO उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.
वाढीव पेन्शनसाठी कोण करू शकते अर्ज?
EPFO च्या नियमानुसार, जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 रोजी EPS चे सदस्य होते आणि 1 सप्टेंबर 2014 नंतर EPFO चे सदस्य राहिले होते, ते आता वाढीव पेन्शनसाठी अर्ज करू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, EPFO ने 20 फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक जारी केले होते. त्यानंतर 4 मार्च 2023 रोजी, EPFO ने सेवानिवृत्त EPS सदस्यांचे पर्याय बंद केले.