PM Kisan : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. तसेच आता या योजनेचा पुढील हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. याचा फायदा देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे.
आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना १२ हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच आता १३ वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. होळीपूर्वी शेतकऱ्यांना सरकारकडून शेतकऱ्यांना १३ व्या हफ्त्याचे पैसे दिले जाऊ शकतात.
कधी दिला जाऊ शकतो १३ वा हफ्ता?
केंद्र सरकारकडून नवीन वर्षातील एकही हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला नाही. आता लवकरच होळी येणार आहे. त्याअगोदर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून शेतकऱ्यांची होळी गोड करणार आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी किती रुपये दिले जातात?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. वर्षातून ३ वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये पाठवले जातात. दर चार महिन्यांनी हे पैसे पाठवले जातात. या योजनेचा फायदा फक्त अल्पभूधारक शेतकरीच घेऊ शकतात.
असा घेऊ शकता या योजनेचा लाभ
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जमिनीची पडताळणी करून घ्यावी लागेल, जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळू शकतात.
या अंतर्गत, तुमच्यासाठी ई-केवायसी करणे देखील अनिवार्य आहे.
जर तुम्ही बाहेर जाऊन हे काम पूर्ण करू शकत नसाल, तर तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in च्या मदतीने घरी बसून ई-केवायसी करू शकता.