Gold Price Today : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विक्रमी दरवाढीनंतर सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करण्याची हीच वेळ मानली जात आहे.
थोड्याच दिवसांत लग्नसराई सुरु होणार आहे. पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा विक्रम केला होता.

सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुम्हीही लग्नासाठी दागिने खरेदी करणार असाल तर तुम्ही आताच खरेदी करा. कारण सोने ६० हजारांच्या पार पोहोचण्याची शक्यता आहे.
सोने 62 हजारांपर्यंत वाढू शकते
येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. सोने 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकते. तर चांदी 80 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज सोने आणि चांदीच्या दारात घसरण पाहायला मिळत आहे.
सोने चांदीच्या दरात घसरण
बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 56860 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर पोहोचला आहे.
चांदीचा भाव 69 रुपयांनी घसरून 68473 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला आहे. तत्पूर्वी, मंगळवारी बंद झालेल्या व्यापार सत्रात सोने 56969 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68542 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
सोने आणि चांदीचे नवीन दर https://ibjarates.com या वेबसाइट वर पाहू शकतात. सराफा बाजारात आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याची ही संधी मानली जात आहे.