सुखद वार्ता : आता सोन्याच्या दागिन्यांना मिळाणार विमा संरक्षण! एस.जी.कायगांवकर ज्वेलर्सची अनोखी योजना

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-अनेकदा दागिने चोरीला जाण्याची मनात भिती असते. त्यामुळे प्रत्येक जण दागिन्यांना जीवापाड जपतो.

ग्राहकांची दागिन्यांमधील ही भावनिक गुंतवणूक लक्षात घेवून एस.जी.कायगांवकर ज्वेलर्सने विमा संरक्षणाची अभिनव योजना आणली आहे. यात विम्याचा प्रिमियम दालनातर्फे कंपनीला अदा केला जाईल.

अशी माहिती सागर कायगांवकर यांनी दिली. शुध्द बावनकशी सोन्याप्रमाणे विश्वसीनयतेची परंपरा असलेल्या नगरमधील प्रसिध्द एस.जी.कायगांवकर सुवर्णदालनात आता सुंदर दागिन्यांबरोबरच मौल्यवान दागिन्यांना विमा कवचही मिळणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रकारचे सोने, चांदी, डायमंडच्या दागिन्यांवर मोफत विमा कवच मिळणार असून संपूर्ण वर्षभर सोन्याचे मंगळसूत्र तसेच डायमंडला विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

ग्राहकांनी केलेली ही मौल्यवान खरेदी सुरक्षित रहावी, चोरीला वगैरे गेल्यास त्याचा परतावा मिळावा या उद्देशाने ही अभिनव विमा कवच योजना आणल्याची माहिती सुभाष कायगांवकर यांनी दिली.

सागर कायगांवकर यांनी सांगितले की, आपल्याकडे सोने,चांदी, डायमंडची खरेदी करताना हौस, आवड याबरोबरच दीर्घ काळाची गुंतवणुक म्हणूनही पाहिले जात.

फेब्रुवारीमध्ये महिनाभर सर्व प्रकारच्या दागिन्यांना मोफत विमा कवच मिळणार असून उर्वरित वर्षभर सोन्याचे मंगळसूत्र व डायमंडला विमा संरक्षण मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe