LPG Gas Subsidy : देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाच्या आणि गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती अधिक वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा पडत आहे.
दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडर खरेदीवर सबसिडी दिली जात होती. मात्र काही काळापासून ती सबसिडीही देणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
गॅसच्या वाढत्या किमती पाहता सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारकडून यंदाच्या नवीन वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे मात्र वाढत्या महागाई बाबत कोणताही निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला नाही.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून आता त्या पार्श्वभूमीवर नवे निर्णय घेतले जात आहेत. सरकारकडून गॅस सिलिंडर सबसिडीबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
गॅस सिलिंडर धारकांसाठी केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. गरीब लोकांसाठी गॅस सिलिंडर सबसिडी पुन्हा एकदा सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारने जर गॅस सिलिंडर सबसिडीबाबत निणय घेतला तर सामान्य जनतेला थोडा का होईना दिलासा मिळू शकतो. लवकरच केंद्र सरकारकडून गॅस सबसिडी जाहीर केली जाऊ शकते.
गगनाला भिडलेल्या गॅस सिलिंडरच्या दरापासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.