GOOD NEWS : भारतात ‘या’ महिन्यात येतेय Musk यांची बिना ड्रॉयव्हर वाली टेस्ला

Ahmednagarlive24 office
Published:

भारताचा विकास सध्या जोरात सुरु आहे. शासनाची विविध धोरणे व मोठी बाजारपेठ यांमुळे भारतात अनेक उद्योग येत आहेत. अँपल या मोठ्या कंपनीने देखील आपले प्रोडक्ट भारतात बनवण्याचे सुरु केले आहे. आता आणखी एक महत्वाची बातमी आहे. मस्क यांची टेस्ला ही देखील आता भारतात येणार आहे. भारतातील १४० कोटी लोकांची बाजारपेठ आणि उत्तम धोरण पाहून अनेकांनी येथे आपले कारखाने थाटायला सुरुवात केली आहे.

‘या’ महिन्यात येऊ शकते मस्क यांची टेस्ला:-एका वृत्तानुसार, जानेवारी 2024 मध्ये टेस्ला भारतात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या मुद्द्यावर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठकही झाली, ज्यात ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या नियमांमध्ये बदल झाल्याचे समोर आले. टेस्लाचा मार्ग सुकर करण्यासाठी नियमांमध्ये बदल केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

तुम्हाला टॅक्समध्ये मिळू शकते सवलत:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात अमेरिका दौऱ्यात एलन मस्क यांची भेट घेतली होती. तेव्हापासून सरकारने शाश्वत ईव्ही उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. आयात शुल्कही ६० वरून ४० टक्क्यांवर आणले पाहिजे यासह काही अपेक्षा मस्क यांच्या आहेत. सरकार आता या बदलासाठी सज्ज झाले आहे.

पॉलिसी मध्ये केलेले बदल हे सर्वांसाठीच असणार:-पॉलिसी मधील बदल केवळ टेस्लासाठी नाही तर सर्व कंपन्यांसाठी आहेत. त्यामुळे अधिकाधिक परदेशी कंपन्या या बदलांचा फायदा घेऊ शकतात. यामुळे देशातील ईव्ही सेगमेंटमध्ये अभूतपूर्व वाढ होण्याची शक्यता आहे. देशी कंपन्यांना परदेशी कंपन्यांकडून उत्पादनात मदत मिळू शकते.

फायदेशीर ठरू शकतो निर्णय:-हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. यातून मोठा रोजगार निर्माण होईल. तसेच इलेक्ट्रिक वाहनाच्या सेक्टरमध्ये मोठी क्रांती होईल अशी अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe