Flight To Ayodhya : काल अर्थातच 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथील भव्य राम मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामरायाचे राम मंदिर रामभक्तांसाठी सुरू झाले आहे. आजपासून अयोध्या येथील भव्य राम मंदिरात दर्शनाला देखील सुरुवात झाली आहे.
यामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या भारतासह संपूर्ण जगात राम मंदिर खुले झाले असल्याने धार्मिक उत्साहाचे वातावरण आहे. रामभक्त तब्बल पाच शतकांच्या म्हणजेच पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राम मंदिर सुरू झाले असल्याने मोठे आनंदी आहेत.
दरम्यान रामभक्तांचा हा आनंद आणखी द्विगुणीत होणार आहे. याचे कारण म्हणजे आता फक्त 1622 रुपयात विमानाने अयोध्याला जाता येणार आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे आता विमानाने अयोध्येला जाण्यासाठी फक्त 1622 रुपयाचे तिकीट लागणार आहे.
स्पाईसजेट या कंपनीने ही भन्नाट ऑफर आणली आहे. ही ऑफर देशातील अनेक शहरांमध्ये लागू राहणार आहे. कंपनीने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, Spicejet ने प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना आता मुंबई-गोवा, दिल्ली-जयपूर आणि गुवाहाटी-बागडोगरा यासारख्या अनेक देशांतर्गत फ्लाइटची तिकिटे फक्त 1,622 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
या शहरांव्यतिरिक्त इतर काही शहरांमध्येही अशा भाड्यात विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आता कंपनीकडून डोमेस्टिक प्रवासाचे विमान तिकीट 1622 मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्पाइसजेटची ही ऑफर कालपासून म्हणजे 22 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे.
पण ही ऑफर काही ठराविक कालावधीसाठी लागू राहणार आहे. ही ऑफर 28 जानेवारी 2024 रोजी संपणार आहे. मात्र, या ऑफरमध्ये तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फ्लाइट बुक करू शकणार आहेत. मात्र ही ऑफर काही शहरांमध्येच सुरू करण्यात आली आहे.
या ऑफरअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकीट मिळते. या ऑफरचा फायदा ग्रुप बुकिंगवर उपलब्ध राहणार नाही. याशिवाय, ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरमध्ये विलीन केली जाऊ शकत नाही. तुम्ही या योजनेअंतर्गत तिकीट रद्द केल्यास, रद्दीकरण शुल्कासह पैसे परत केले जातील.
दरम्यान, स्पाइसजेट या एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून पुढील महिन्यापासून अर्थातच 1 फेब्रुवारी 2024 पासून अयोध्येला देशातील वेगवेगळ्या शहरांमधून थेट विमान सेवा सुरू केली जाणार आहे. चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा आणि दरभंगा अशा अनेक शहरांमधून ही विमान सेवा सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, स्पाईसजेटने सुरू केलेल्या 1622 रुपयांच्या तिकिटाच्या ऑफरमध्ये अयोध्येला जाणाऱ्या आणि येणाऱ्या नवीन फ्लाइट्सची यादी देखील समाविष्ट राहणार आहे. म्हणजेच पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या अयोध्यासाठीच्या थेट विमानसेवेचे स्पाइस जेटचे तिकीट देखील 1622 रुपयांना बुक होणार आहे. याचा अर्थ 1622 रुपयात आयोध्यावारी होणार आहे. देशातील रामभक्तांसाठी ही निश्चितच एक आनंदाची बातमी राहणार आहे.