Kisan Karj Mafi New List 2023 : खुशखबर! आता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ, नवीन यादी जाहीर; असे पहा यादीत तुमचे नाव

Ahmednagarlive24 office
Published:

Kisan Karj Mafi New List 2023 : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच नवनवीन योजना आणून शेती क्षेत्राला चालना देण्याचा पर्यंत केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. सरकारने आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिली आहे.

आता सरकारकडून सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. सरकारकडून आता कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्याची नवीन वर्षातील यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बँकेककडून कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार आहे.

किसान कर्ज माफी योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 25 मार्च 2016 पूर्वी कर्ज घेतले आहे आणि त्याची रक्कम 100000 पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.

किसान कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच या पोर्टलवर जाऊन तुम्ही जाहीर केलेल्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे देखील तपासू शकता.

कर्जमाफीसाठी आवश्यक पात्रता?

अर्जदार हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील असणे आवश्यक आहे.

अर्जदार 25 मार्च 2016 पूर्वी कर्जासाठी पात्र असेल.

बँकेला प्रमाणपत्र सादर केल्यावरच कर्ज माफ केले जाईल.

जर शेतकऱ्याने एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तरच तुमचे कर्ज माफ होईल.

कर्जमाफी केलेली यादी कशी तपासायची?

किसान कर्ज माफी योजनेची यादी तपासण्यासाठी, तुम्हाला प्रथम त्याच्या अधिकृत वेबसाइट Upkisankarjrahat.Upsdc.Gov.In वर जाणे आवश्यक आहे.

वेबसाइटला भेट दिल्यानंतर त्याचे होमपेज तुमच्यासमोर उघडेल.

येथे तुम्हाला किसान कर्ज माफी लिस्ट 2023 च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा निवडा आणि मागितलेली इतर माहिती टाका, ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

यानंतर, किसान कर्ज माफी यादी तुमच्या समोर प्रदर्शित होईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe