अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने चेन्नई विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. कंपनीने याबद्दल https://careers.jio.com वर अधिकृत माहिती दिली आहे.
या वेबसीईटवर पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. रिलायन्स जिओने 200 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, इंटरप्राइज सेल्स ऑफिसर,
कस्टमर सर्व्हिसेस, इंजीनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, एचआर अॅण्ड ट्रेनिंग ऑपरेशन्स अशा क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी रिलायन्स जिओने अर्ज मागवले आहेत. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर रिलायन्स जिओकडून उमेदवारांची यादी https://careers.jio.com या वेबसाईटवर जाहीर केली जाईल.
सरकारी नोकरीची संधी :- शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
दरम्यान, ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे .दरम्यान, याबाबत अद्याप अर्ज प्रक्रिया सुरु झालेली नाही.
लवकरच अर्ज प्रक्रिया सुरु होऊन भरतीबाबची माहिती आपल्या www.careernama.com या संकेतस्थळावर वाचायला मिळेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
कोरोना लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर आता राज्य सरकारने भरती प्रकियेला गती देण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरतीची गुडन्यूज दिल्यानंतर, पोलीस दलातही मोठी भरती लवकरच सुरु होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved