Government Scheme : केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना सुरु करत आहेत. त्यामुळे देशातील लाखो महिलांना त्याचा फायदा होत आहे. आता अशी एक योजना सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. ज्यामधून महिलांना पेन्शन दिली जाणार आहे.
देशातील विधवा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून विधवा पेन्शन योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व विधवा महिला या विधवा योजनेचा लाभ घेऊन दरमहा पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
प्रत्येक राज्य सरकारच्या या योजेनची रक्कम ही वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य सरकारने ठरवलेली रकमेनुसार विधवा महिलांना त्याचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊन पेन्शन मिळवू शकतात.
देशात अशा अनेक महिला आहेत त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि त्या त्यांच्या पतीवरच अवलंबून होत्या. त्यामुळे अशा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारकडून विधवा पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे.
विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त दारिद्र्यरेषेखालील महिलांनाच मिळणार आहे. तसेच ज्या महिलांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांना त्याचा लाभ दिला जाणार आहे.
हरियाणा राज्यातील विधवा पेन्शन योजना
हरियाणा राज्य सरकारकडून विधवा महिलांना दरमहा 2250 रुपये पेन्शन दिली जात आहे. शासनाच्या या सुविधेचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांनाच मिळणार आहे.
उत्तर प्रदेशातील विधवा पेन्शन योजना
उत्तर प्रदेश सरकारकडूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विधवा महिलांना दरमहा 300 रुपये देत आहे. त्यामुळे दरमहा 3600 रुपयांचा लाभ महिलांना होत आहे. ही रक्कम थेट महिलांच्या खात्यात वर्ग केली जाते.
इतर राज्यांमध्ये पेन्शन योजनेचा लाभ
प्रत्येक राज्याच्या पॉलिसीनुसार विधवा महिलांना वेगवेगळ्या रकमेमध्ये पेन्शन दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून विधवा पेन्शन योजनेंतर्गत महिलांना 900 रुपये दिले जातात. तसेच दिल्ली सरकारकडून विधवा महिलांना दर तीन महिन्यांनी 2500 रुपयांचा लाभ दिला जातो.
राजस्थान, उत्तराखंडमधील विधवा पेन्शन योजनेंतर्गत दरमहा महिलांना 750 रुपयांचा लाभ दिला जात आहे. तर गुजरात सरकार विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1250 रुपये देते.
विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
उत्पन्न प्रमाणपत्र
वय प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो