PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार ! योग्य भावात बी-बियाणे अन् औजारे सर्व सुविधा एकाच छताखाली

Ahmednagarlive24 office
Published:

PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांना बियाणे, खते कीटकनाशके तसेच कृषी औजारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने कृषी समृद्धी केंद्र सुरू केली आहेत जिल्ह्यातील १ हजार ८५० केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. सर्व केंद्रांच्या माध्यमातून सेवा सुरळीत देण्यात येत आहे.

खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात कृषी निविष्ठांसाठी वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जावे लागते. सर्व साहित्य एकाच छताखाली स्वस्त दरात खरेदी करता यावे यासाठी केंद्र शासनाने कृषी समृद्धी केंद्रांची सुरुवात केली. शेतीसंदर्भातील सर्व सेवा आता एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत.

प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रातून शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी केल्यानंतर सबसिडीदेखील मिळणार आहे. यासोबतच या केंद्रांवरील दर अन्य केंद्रांच्या तुलनेत कमी राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या योजनेतून तालुक्यांमध्ये कृषी समृद्धी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणार आहेत-सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर

शेतकऱ्यांना मार्गदर्शनही मिळणार

कृषी समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकन्यांना एकाच छताखाली कृषीविषयक सर्व साहित्य किफायतशीर भावात मिळेल. शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, कीड व रोग याबाबत मार्गदर्शनही मिळणार आहे. एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार असल्याने मोठी सोय होणार आहे.

केंद्रात काय मिळणार?

■ शेतकयांना दर्जेदार बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते योग्य भावात मिळणार आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना माती, पाणी परीक्षणाची सुविधा मिळणार नाही.

जिल्ह्यात १८५० केंद्रे सुरु

जिल्ह्यात जवळपास १ हजार ८५० केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. केंद्रात सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील. शेतकयांची होणारी फसवणूक थांबून श्रम व पैशाची बचत होणार आहे.

काय आहे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र

किसान समृद्धी केंद्रावर शेतकऱ्यांना खते आणि कीटकनाशके खरेदी करण्याची तसेच उपकरणे, मशीनरी आदी भाड्याने देण्याची सुविधा असेल. सल्ला आणि माती परीक्षण आदी सुविधेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe