7th Pay DA Arrears : सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण लवकरच नवीन वर्षातील अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतला जाऊ शकतो.
कोरोना काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA थकला आहे. कर्मचाऱ्यांना अजूनही DA थकबाकी मिळाली नाही. मात्र केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांना लवकरच DA थकबाकी मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून DA थकबाकी मिळावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. आता ही मागणी सरकारकडून मान्य करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ८ हफ्त्यात ही DA थकबाकी जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मार्च 2023 मध्ये डीए वाढीची घोषणा केली जाईल
एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मार्च 2023 मध्ये DA आणि DR जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून होणार आहे.
दरम्यान, विविध राज्य सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआर देखील जाहीर केले जात आहेत. आता थकबाकी डीए आणि डीआर बाबत तेलंगणा सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
DA 20.2% पर्यंत वाढला
तेलंगणा सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या DA आणि DA मध्ये 2.73% वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा डीए १७.२९% वरून २०.२% झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री हरीश राव यांनी सांगितले की, ही वाढ 1 जुलै 2021 पासून लागू केली जाईल. हे पैसे कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यात 8 हप्त्यांमध्ये जमा केले जातील.