Grape Farmers: अफगाणिस्तानच्या टेक्निकचा वापर करून द्राक्ष साठवणूक करा; सहा महिने टिकणार द्राक्ष

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Grape Farmers :- अफगाणिस्तान (Afghanistan) गेल्या अनेक वर्षांपासून युद्धाचे चटके सहन करत आहे. मागच्या वर्षी अफगाणिस्तानात सत्तापरिवर्तन झाले आणि तालिबानची सत्ता आली.

सत्तापरिवर्तन होताना अफगानिस्तानाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पण आज आम्‍ही तुम्‍हाला तालिबान आणि दहशतवादाऐवजी अफगाणिस्तानच्‍या ऐतिहासिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणार आहोत,

ज्‍याच्‍या माध्‍यमातून तेथील लोक थंड वातावरणात द्राक्षे (Grape Farming) आणि इतर फळे दीर्घकाळ वीज आणि रेफ्रिजरेटरशिवाय साठवणूक करून ठेवतात.

ही टेक्निक एवढी खास आहे की, अफगाणिस्तान मधील शेतकरी लोक सहा महिने द्राक्षे टिकवून ठेवतात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, द्राक्षे टिकवून (Grape Storage) ठेवण्याचे हे तंत्र मातीशी निगडित आहे.

या टेक्निकमध्ये मातीच्या भांड्याचा वापर केला जातो, ज्यामध्ये द्राक्षे ठेवली जातात आणि भांडे वरून मातीने बंद केली जातात. माती मजबूत ठेवण्यासाठी पेंढा मिसळून कंटेनर तयार केले जाते.

हे मातीचे भांडे पूर्णपणे सील केलेले असते, यामुळे कोणत्याही प्रकारची हवा आत प्रवेश करू शकत नाही. या टेक्निकचा अफगाणिस्तानच्या उत्तर ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे.

या टेक्निकला कांगिना म्हणून अफगाणिस्तान मध्ये ओळखले जाते. या टेक्निकची सर्वात मोठी विशेषता म्हणजे द्राक्षांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारची फळे याद्वारे साठवून ठेवली जाऊ शकतात. हे तंत्रज्ञान पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केले गेले आहे, परंतु ते अद्याप दस्तऐवजीकरण केलेले नाही.

काबूलजवळ राहणारे शेतकरी झियाउल हक अहमदी सांगतात की, त्यांच्या वडिलांनी त्यांना या तंत्राबद्दल शिकवले, नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला ते शिकवले.

लहान शंकू बनवून त्यामध्ये फळे बराच काळ ठेवली जातात. फळ विक्रेते देखील या टेक्निकचा वापर करतात आणि ग्राहक आल्यावर काठ्या किंवा दगडाने मधूनच तोडतात आणि फळे बाहेर काढतात आणि त्यांची विक्री करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe