Vi Plan : टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन सादर केले जात आहेत. जर तुम्ही Vodafone-Idea टेलिकॉम कंपनीचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी कंपनीने कमी पैशात वर्षभर चालणारे प्लॅन आणले आहेत. त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे.
Vodafone-Idea कंपनीकडून ग्राहकांसाठी स्वस्तात जास्त दिवस चालणारे मस्त प्लॅन आणेल आहेत. त्या प्लॅनची किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे रिचार्ज प्लॅन टाकून तुम्ही वर्षभर सिमकार्ड चालवू शकता.
जर तुम्ही वर्षभरासाठी रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर आता Vodafone-Idea कंपनीकडून कमी पैशात वर्षभराचे प्लॅन आणले आहेत. Vi चे हे रिचार्ज कमी पैशात दीर्घवेळ चालतात आणि बरेच फायदे देत आहेत.
Vi 1799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जर तुम्ही Vi चा वर्षभराचा रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी 1799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन कंपनीने आणला आहे. ऑल इंडिया फ्री अनलिमिटेड कॉलिंग ऑफर देत आहे. रोमिंगसाठी कोणतेही वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत.
Vi 1799 रुपयांच्या प्लॅनचे तपशील
Vi चा 1799 रुपयांचा प्लॅन अनेक फायदे देत आहे. यामध्ये 24 जीबी डेटाचा लाभ मिळत आहे. हा डेटा तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी दिला जात आहे. तसेच 3600 एसएमएसचा लाभही दिला जातो.
या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष आहे. सिम वर्षभर सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. एकंदरीत, सिम सक्रिय ठेवण्यासाठी ही योजना सर्वोत्तम ठरू शकते.