भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा खूप चांगला फलंदाज तसेच एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे.
तो त्याच्या तंदुरुस्तीकडे खूप लक्ष देतो. अलीकडेच विराटने टीम इंडियामधील कोणत्या खेळाडूला सांगितले की, क्षेत्ररक्षणात तो सर्वोत्कृष्ट आहे.
स्टार स्पोर्ट्सने अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रश्न विचारला. टीम इंडियामध्ये कोणता खेळाडू क्षेत्ररक्षणात सर्वोत्कृष्ट आहे.
चाहत्यांना विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले गेले.
भारतीय कर्णधार विराट कोहली याने यासंदर्भात अभिप्राय दिला. त्याने उत्तर दिले की रवींद्र जडेजा हा सर्वोत्कृष्ट फील्डर आहे.
सध्या क्षेत्ररक्षणात रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा आधारस्तंभ मनाला जातो.
अष्टपैलू कामगिरीमुळे तो कर्णधार कोहलीचा देखील आवडता प्लेयर बनला आहे.