Hardik Pandya-Natasha Wedding : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सुपर स्टार खेळाडू हार्दिक पांड्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. कधी आपल्या खेळामुळे तर कधी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे. यावेळी देखील तो सोशल मीडियावर त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर सध्या हार्दिकच्या दुसऱ्या लग्नाची बातमी वाऱ्या सारखी पसरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या व्हॅलेंटाइन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2023 रोजी दुसरा लग्न करणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल कि हार्दिक कोणाशी दुसरा लग्न करणार आहे. चला मग जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे .

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या 14 फेब्रुवारी 2023 रोजी त्याची पत्नी नताशा हिच्याशी दुसरे लग्न करणार आहे. उदयपूरमध्ये या वेळी हे जोडपे शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि हार्दिक-नताशाचे 2020 मध्ये कोर्ट मॅरेज झाले होते त्यादरम्यान फक्त त्यांचे कुटुंबीय लग्नात सामील होते परंतु यावेळी हार्दिक-नताशाचे लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पत्नी नतासा स्टॅनकोविच आणि कुटुंबासह उदयपूरला पोहोचला आहे. 13 फेब्रुवारीला म्हणजे आज हार्दिक आणि नताशाचा मेहेंदी समारंभ असणार आहे. त्याच वेळी14 फेब्रुवारी रोजी हे जोडपे त्यांच्या पहिल्या लग्नाच्या 3 वर्षानंतर दुसरे लग्न करणार आहे.
लग्नाची थीम पांढरी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच या दोघांच्या लग्नाला येणारे सर्व पाहुणे पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसणार आहेत. हार्दिक आणि नताशाच्या लग्नाची शोभा वाढवताना अनेक क्रिकेटर्स आणि बॉलीवूड कलाकार पाहायला मिळतात. याचवेळी हे देखील जाणून घ्या कि हार्दिक पांड्या आणि नताशा यांना एक मुलगाही आहे, ज्याचे नाव अगस्त्य पांड्या आहे.
हे पण वाचा :- Valentine Day Offer: व्हॅलेंटाइन डे दिवशी होणार हजारोंची बचत ; बंपर ऑफरसह खरेदी करा ‘हा’ पावरफुल स्मार्टफोन