Health Tips : प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे वापरलेच जाते. आजकाल अनेकजण विविध पदार्थ बनवत असतात त्यामध्ये देखील मीठाचा वापर केला जातो. पण मीठाचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे हे देखील समजले पाहिजे. जर मिठाचा अति वापर झाला तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
तुम्ही अनेकदा कोशिंबीर बनवून खात असाल. उन्हाळ्यामध्ये अनेकजण कोशिंबीर बनवतात आणि मोठ्या प्रमाणावर खात असतात. पण यामध्ये देखील मिठाचा वापर केला जातो. पण कोशिंबीर आणि रायतामध्ये मिठाचा वापर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो.

जर तुम्ही कोशिंबीर किंवा रायतामध्ये मीठ टाकून याचे सेवन केले तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त मिठाच्या सेवनामुळे सोडियमची पातळी वाढू शकते आणि यामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.
सॅलडमध्ये मीठ वापरण्याचे तोटे
कोशिंबिरीमध्ये मीठ टाकणे आरोग्यासाठी घटक ठरू शकते.जास्त मिठाचे सेवन केल्याने शरीरातील सोडियमची पातळी घटते आणि त्याचा परिणाम हळूहळू आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेक रोग जडू लागतात.
जास्त मिठाच्या सेवनामुळे अनेकांना चक्कर येते. त्यामुळे मिठाचे प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. पांढऱ्या मिठाचे तुम्हीही सेवन करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तसेच काळे मीठ देखील शरीरास हानी पोहचवू शकते. याच्या सेवनाने मानवी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाणही कमी होऊ लागते. मिठाच्या अतिसेवनामुळे पाचक एन्झाईम्सलाही हानी पोहोचते.
कोशिंबीर किंवा रायतामध्ये कोणते मीठ वापरावे?
जर तुम्ही खाण्यामध्ये पांढरे मीठ वापरत असाल तर त्याचे सेवन करणे कमी केले पाहिजे. कारण यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहचू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही मिठाचे सेवन केले पाहिजे. कोशिंबीर आणि रायतामध्ये तुम्ही खडे मीठ वापरू शकता. खडे मीठ तुमच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते.
कोशिंबीर आणि रायतामध्ये मिठाचा वापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे कोशिंबीरमध्ये तुम्ही मिठाचा वापर करणे टाळावे. खाण्यामध्ये कमी मिठाचा वापर करणे तुमच्या शरीरासाठी फायद्याचे ठरू शकते.













