IMD Alert : पुढील २४ तास मुसळधार कोसळणार! या १० राज्यांना IMD चा इशारा

Published on -

IMD Alert : देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे अनेक भागात गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच पुढील २४ तासांत हवामान खात्याकडून १० राज्यांना भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वातावरणात होत असलेल्या बदलाचा परिणाम हवामानावर होत आहे. तसेच मार्च महिना सुरु असून उष्णतेत देखील वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. तसेच हवामान खात्याकडून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील २४ तासांत हवामान खात्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोव्याच्या काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दिल्लीमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

आयएमडीने दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फिरोजाबाद, शिकोहाबाद, बदायूं, अलिगढ, हाथरस, कासगंज, मथुरा, आग्रा या आसपासच्या भागात येत्या काही तासांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

१९ मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बी पिकांची काढणी लवकरात लवकर करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

पश्चिम हिमालय, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोव्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

मध्य प्रदेशमधील उज्जैन, रीवा, सागर, ग्वाल्हेर, शहडोल, जबलपूर, इंदूर, नर्मदापुरम, चंबळ विभागातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कालपासून इंदूरसह राज्याच्या विविध भागात पावसासह गारपीट सुरू आहे.

मात्र, पुढील तीन ते चार दिवस असेच वातावरण राहील. त्यामुळे तापमानातही घट दिसून येईल. गेल्या 24 तासांत अनेक राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News