Hero HF Deluxe Bike : भारीच की! आता फक्त ५ हजार रुपयांमध्ये खरेदी करा हिरोची जबरदस्त मायलेज देणारी HF Deluxe बाईक, पहा सविस्तर

Published on -

Hero HF Deluxe Bike : हिरो कंपनीच्या अनेक बाईक भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. तसेच या कंपनीच्या बाईकचा खप देखील सर्वाधिक आहे. हिरो कंपनीकडून जबरदस्त मायलेज देणाऱ्या बाईक सादर केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकही सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक खरेदीला अधिक पसंती देत आहेत.

हिरो कंपनीची HF Deluxe बाईक सध्या ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. कारण या बाईकमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच बाईक मायलेजच्या बाबतीतही दमदार असल्याने ग्राहकांचा या बाईकला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पण या बाईकची किंमत अधिक असल्याने कमी बजेट असलेल्या ग्राहकांना ती खरेदी करता येत नाही. पण आता कमी बजेट असलेले ग्राहक देखील HF Deluxe बाईक खरेदी करू शकतात.

हिरो कंपनीकडून HF Deluxe बाईकवर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक ५ हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटवर HF Deluxe बाईक घरी आणू शकतात. या बाईकवर EMI पर्याय ग्राहकांना दिला जात आहे.

कंपनीची ५ हजार डाऊनपेमेंटची ऑफर मे महिन्यापासून सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मे महिन्यापासून तुम्ही देखील HF Deluxe बाईक ५ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

हिरो मोटोकॉर्पने उत्पादित केलेली Hero HF Deluxe ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे. तसेच ही बाईक अधिक मायलेज देत असल्याने ग्राहकांना चांगलीच आकर्षित करत आहे.

Hero HF Deluxe बाईक इंजिन

Hero HF Deluxe मध्ये 97.2 cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे जे 8,000 rpm वर 7.91 PS पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन चार-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

या वाहनाची इंधन क्षमता आणि ब्रेक सिस्टम जाणून घ्या

HF Deluxe ची इंधन टाकीची क्षमता 9.6 लीटर देण्यात आली आहे. या बाईकमध्ये दोन्ही चाकांना ड्रम ब्रेकसह पुढील चाकास डिस्क ब्रेकचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच ही बाईक प्रति लिटर 65 किमी मायलेज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe