Hero HF100 Bike : कमी बजेटमध्ये खरेदी करा हिरो HF100 बाईक! मिळतेय फक्त 25,000 रुपयांमध्ये, त्वरित घ्या ऑफरचा लाभ

Ahmednagarlive24 office
Published:

Hero HF100 Bike : तुम्हीही बाईक खरेदी करण्यासाठी पैसे जमा करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आता तुम्ही कमी बजेटमध्ये हिरो कंपनीची लोकप्रिय बाईक खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्तीच्या पैशांची गरज नाही.

कमी बजेट असणाऱ्यांचे बाईक खरेदी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे. कारण हिरो HF100 बाईक फक्त 25,000 रुपयांमध्ये मिळत आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे ग्राहक सहज बाईक खरेदी करू शकतात.

भारतातील लोकप्रिय दुचाकी कंपनीच्या Hero HF 100 बाईकवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फिचर देण्यात आले आहेत. तसेच बाईक मायलेच्या बाबतीत देखील जबरदस्त आहे.

अनेक कंपन्यांच्या बाईक बाजारात उपलब्ध आहेत. मात्र हिरो कंपनीच्या बाईक्सला अधिक पसंती मिळत आहे. बाईक लूक, इंजिन, मायलेज आणि कमी किमतीमुळे ग्राहक हिरो कंपनीच्या बाईककडे चांगलेच आकर्षित होत आहेत.

Hero HF100 या बाईकची किंमत कमी असल्याने आणि तिचा लूक जबरदस्त देण्यात आल्याने ग्राहकांना सर्वाधिक पसंतीस येत असलेली बाईक ठरली आहे. ही बाईक मजबुतीसाठी देखील ओळखली जाते.

Hero HF100 या बाईकच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 56,968 रुपये आहे. किंमत अधिक असल्याने कमी बजेट असणारे ही बाईक खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी चांगली ऑफर आहे.

Hero HF100 बाईक फायनान्स

जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही कमी बजेटमध्ये देखील Hero HF100 बाईक खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला फायनान्स कंपनीकडून कर्ज देण्यात येते. त्यामुळे कमी डाउनपेमेंट वर तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

जर तुम्ही 25,000 रुपये डाऊनपेमेंट भरले तर फायनान्स कंपनीकडून तुम्हाला 43,584 रुपये कर्ज दिले जाईल. हे कर्ज तुम्हाला EMI पद्धतीने दरमहा भरावे लागेल. या कर्ज परतफेडीचा कालावधी 3 वर्षांचा असेल यासाठी तुमच्याकडून 9.7 टक्के व्याज आकारले जाईल.

तुम्ही बाईक खरेदी साठी वरील कर्जाचा पर्याय निवडला तर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी 1,400 रुपये मासिक हफ्ता भरावा लागेल. त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

बाईक इंजिन आणि पॉवरट्रेन तपशील

Hero HF100 या बाईकमध्ये 97.2 cc सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन कमाल ८.०२ पीएच पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक प्रति लिटर 83 किलोमीटर मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe