Hero Splendor Plus vs Honda Shine : हिरो स्प्लेंडर की होंडा शाईन यापैकी कोणती आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या सर्व फीचर्स आणि मायलेज

Ahmednagarlive24 office
Published:

Hero Splendor Plus vs Honda Shine : नवीन बाईक खरेदी करत असताना अनेकदा ग्राहक कोणत्या कंपनीची बाईक खरेदी करायची यावरून गोंधळून गेलेला असतो. तसेच बाईक खरेदी करताना अनेकांना त्या बाईकच्या फीचर्सबद्दल माहिती नसते.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक लॉन्च झाल्या आहेत. त्यामुळे नवीन बाईक खरेदी करताना ग्राहक गोंधळात पडतो. ग्राहकांना बेस्ट मायलेज देणारी बाईक कोणती हे माहिती नसते त्यामुळे अनेकांना बाईक खरेदी केल्यानंतर अनके समस्या निर्माण होतात.

भारतीय बाजारात Hero Splendor Plus आणि Honda Shine या दोन बाईक लॉन्च झाल्या आहेत. आता या दोन्हीही बाईक भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र ग्राहकांमध्ये दोन्ही बाईकबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

Hero Splendor Plus आणि Honda Shine या दोन बाईक लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. तसेच बाईक खरेदी करताना ग्राहकांना कोणती बाईक खरेदी करावी असा संभ्रम तयार होत आहे.

Hero Splendor Plus आणि Honda Shine बाईकमधील वैशिष्ट्ये

Hero Splendor Plus या बाईकमध्ये कंपनीकडून 97.2cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे. तसेच होंडा कंपनीकडून Shine बाईकमध्ये 124cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन बसवलेले आहे.

त्यामुळे आता दोन्ही बाईकमधील इंजिनमध्ये किती फरक आहे देखील दिसून येईल. Hero Splendor Plus बाईकपेक्षा Honda Shine बाईकचे इंजिन थोडे जास्त पॉवरफुल आहे. Hero Splendor Plus बाईकचे इंजिन 8,000 rpm वर 8.02 bhp ची कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

तसेच होंडा शाईन बाईकचे इंजिन 7,500 rpm वर 10.59 bhp कमाल पॉवर आणि 6,000 rpm वर 11 Nm पीक टॉर्क निर्माण करते. त्यामुळे होंडा शाईन बाईकचे इंजिन जास्त पॉवर आणि टॉर्क आउटपुट देते.

मायलेजबाबत बोलायचे झाल्यास, दोन्ही बाईक जबरदस्त मायलेज देत आहेत. हिरो स्प्लेंडर प्लस सुमारे 70 kmpl चे मायलेज देते, तर Honda Shine 65 kmpl चे मायलेज देते.

सस्पेंशन आणि ब्रेक्स

दोन्ही कंपन्यांकडून दोन्ही बाईकमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. Hero Splendor Plus मध्ये टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस अॅडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक शोषक आहेत, तर Honda Shine ला टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि हायड्रॉलिक रिअर सस्पेंशन मिळते. दोन्ही बाईकच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक्स आहेत.

किंमत

दोन्ही बाईकच्या किमती या वेगवेगळ्या आहेत. Hero Splendor Plus ची एक्स शोरूम किंमत 64,000 ते रु. 68,000 ठेवण्यात आली आहे. तर होंडा शाईनची एक्स शोरूम किंमत 72,000 ते 78,000 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आत समजलेच असेल की होंडा शाईन हिरो स्प्लेंडर बाईकपेक्षा अधिक शक्तीशाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe