लग्नाचा बाजार मांडणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; आता घटस्फोटासाठी पहावी लागणार इतका काळ वाट

Published on -

३० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : दोन हिंदू व्यक्तींदरम्यान विवाह हे एक पवित्र बंधन आहे.मात्र मागील काही काळापासून लग्न म्हणजे एक प्रकारचा व्यवहार अथवा पोरखेळ झाला होता.आज झालेले लग्न किमान महिना दोन महिने टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.यात अनेकदा मुलांची फसवणूक देखील केली जात होती.

मात्र आता न्यायालयानेच याबात कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे भलेही दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने विभक्त होण्यासाठी तयार असतील, तरीही वर्षभराच्या आत विवाहसंबंध तोडता येणार नाही,असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

त्यामुळे फक्त संपत्तीसाठी लग्न करून काही काळातच लग्न मोडणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. हिंदू विवाह कायदा-१९५५ च्या कलम-१४ नुसार जो पर्यंत असामान्य परिस्थिती तथा अनैतिकतेची समस्या निर्माण झालेली नसेल, तोपर्यंत विवाह वर्षभराच्या आत तोडता येणार नाही,असे न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्या. डी. रमेश यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यासंदर्भात कलम-१४ मध्ये विवाहाच्या तारखेपासून किमान एक वर्षाची मुदत पूर्ण होण्याची अट निर्धारित करण्यात आली आहे.
परंतु,असामान्य परिस्थिती तथा अनैतिकतेच्या समस्येवेळी अशा अर्जावर विचार केला जाऊ शकतो.

पण, संबंधित प्रकरणात दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.त्यामुळे खंडपीठाने अर्ज फेटाळून लावत वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने घटस्फोटासाठी अर्ज करण्यास सांगितले.किमान वर्षभराचा कालावधी पूर्ण न झाल्याच्या मुद्द्यावरूनच यापूर्वी सहारनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला होता.त्यामुळे संबंधित जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe