Honda CB300R Bike : सावधान! होंडाची CB300R बाईक घेऊ शकते तुमचा जीव, कंपनीने परत मागवल्या बाईक; जाणून घ्या कारण

Published on -

Honda CB300R Bike : देशातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी होंडा ही एक दुचाकी बाईक कंपनी आहे. होंडा कंपनीकडून त्यांच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक बाईक बाजारात सादर केल्या जात आहेत. या बाईक आणि स्कूटरमध्ये कंपनीकडून अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत.

होंडा कंपनीची CB300R बाईक देखील अधिक लोकप्रिय आहे. पण या बाईकबद्दल कंपनीकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हालाही धक्का बसू शकतो. बाईक बद्दल सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

CB300R होंडाच्या या बाईकमध्ये काही दोष आढळले आहेत. त्यामुळे कंपनीकडून CB300R बाईक्स परत मागवण्यात आल्या आहेत. 2022 मधील काही युनिट्स कंपनीने परत मागवल्या आहेत.

Honda CB300R बाईक वापरकर्त्यांचे टेन्शन वाढले

होंडा कंपनीची लोकप्रिय बाईक CB300R मध्ये दोष आढळले असल्याने बाईक खरेदीदारांचे टेन्शन वाढले आहे. कंपनीकडून सांगण्यात येत आहे की CB300R बाइकच्या इंजिनमधून पेट्रोल बाहेर येत आहे, त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे.

ही मोठी त्रुटी पाहता कंपनीकडून बाईक पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. इंजिन मधून पेट्रोल बाहेर येऊन आग लागण्यापासून अनेक अपघात घडू शकतात. त्यामुळे कंपनीने या अगोदरच बाईक पुन्हा मागवल्या आहेत.

त्यामुळे कंपनीने 15 एप्रिल 2023 पासून बाइकचे सर्व प्रभावी भाग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व बदल कंपनी मोफत करणार आहेत.या बाईकचे आधुनिक घटक आणि रेट्रो स्टाइल सर्वांना आकर्षित करते. या बाईकमध्ये 286cc DOHC 4-व्हॉल्व्ह लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे तिला खूप शक्तिशाली बनवते.

त्यामुळे आता ज्या ग्राहकांनी २०२२ मध्ये CB300R बाईक खरेदी केली आहे त्यांच्या बाईकबद्दल काही त्रुटी असल्यास कंपनीकडून ही बाईक पुन्हा मागवली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना आता CB300R बाईक पुन्हा कंपनीला द्यावी लागणार आहे.

कंपनीकडून ग्राहकांना बाईकमधील त्रुटी दूर करून पुन्हा बाईक देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना कोणताही अपघात होण्याची शक्यता नाही. तसेच कंपनीकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.

Honda CB300R ची वैशिष्ट्ये

फीचर्सHonda CB300R Bike
इंजिन286cc इंजिन
पॉवर, टॉर्क30.7 bhp पॉवर आणि  27.5 Nm टॉर्क
ब्रेकएंटी-लॉकिंग ब्रेकिंग
किंमत2.77 लाख रुपये
कलरमैट स्टील ब्लैक आणि पर्ल स्पार्टन रेड
लाईटLED यूनिट्स आणि इंटीग्रेटेड LED डे-टाइम रनिंग लाइट्स
इंधन क्षमता9.7 लीटर

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe