Honda Scooter : Honda ने लॉन्च केली शानदार PCX 160 Maxi स्कूटर, जाणून घ्या किंमत

Honda Scooter : देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या होंडा कंपनीने आता पुन्हा एकदा नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्राहकांना नवीन स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. तसेच या स्कूटरमध्ये कंपनीकडून जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

होंडा कंपनीने या स्कूटरचे नाव PCX 160 Maxi असे ठेवले आहे. या स्कूटरची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचा लूक आणि फीचर्सने सर्वांना वेड लावले आहे. तसेच या स्कूटरमध्ये जबरदस्त इंजिन देखील देण्यात आले आहे.

Honda 2023 PCX 160 Maxi या स्कूटरमध्ये होंडा कंपनीकडून 160cc सिंगल-सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे. जे स्कूटरला पॉवरफुल करते. तसेच स्कूटरमध्ये कूल मोटर आहे जी 16bhp पॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करते.

तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या स्कूटरमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS देण्यात आले आहे. त्यामुळे स्कूटर सुरक्षेच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. त्यामुळे तुम्हीही स्कूटर खरेदी करू शकता.

कंपनीकडून या स्कूटरची किंमत 1 लाख 82 हजार रुपये ठेवली आहे. या स्कूटरमध्ये स्पीडोमीटर, फ्युएल लेव्हल इंडिकेटर, टाईम, ट्रिप मीटर आदी फीचर्स देण्यात आले आहेत.

Honda 2023 PCX 160 Maxi स्कूटरची वैशिष्ट्ये

फीचर्स Honda 2023 PCX 160 Maxi Scooter
इंजिन 160cc सिंगल-सिलेंडर इंजिन
पॉवर/टॉर्क 16 bhp पॉवर आणि 14 Nm पीक टॉर्क
गिअरबॉक्स CVT गिअरबॉक्स
टायर 14-इंच पुढचे आणि 13-इंच मागील चाक
ब्रेक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम
लाइट एलईडी हेडलाइट्स आणि फ्रंट टर्न इंडिकेटर
इतर वैशिष्ट्ये Speedometer, Fuel Level Indicator, Time, Trip Meter

 

Honda 2023 PCX 160 Maxi स्कूटर भारतात कधी लॉन्च होईल?

होंडा कंपनीने ही स्कूटर नुकतीच इंडोनेशियामध्ये लॉन्च केली आहे. भारतामध्ये होंडा कंपनीकडून ही स्कूटर लॉन्च केली जाणार आहे. भारतीय नागरिकांना ही स्कूटर लॉन्च होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

सध्या PCX 160 Maxi स्कूटर भारतात लॉन्च होणार नाही. भारतामध्ये २०२४ मध्ये ही स्कूटर लॉन्च केली जाईल. मात्र होंडा कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe