India News : भारतात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ

India News : चालू वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत दरवर्षीच्या तुलनेत १.८ टक्क्यांच्या किंचित वाढीसह देशातील विजेचा वापर ४०७. ७६ अब्ज युनिट्सवर पोहोचला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल-मे या कालावधीत वीज उत्पादनात ०.१ टक्क्याने घट झाली आहे,

तर २०२२ मधील या कालावधीत ती १७.४ टक्क्यांनी वाढली. आयआयपी माहितीवरून असे दिसून आले आहे की, मे महिन्यात वीज निर्मितीची वाढ जवळपास ०.९ टक्यांवर राहिली, तर एप्रिलमध्ये ती १.१ टक्यांनी घसरल्याचे सरकारी आकडेवारीतून कळते.

गेल्या वर्षीच्या एप्रिल-जून तिमाहीत विजेचा वापर ४००. ४४ अब्ज युनिट (बीयू) होता आणि २०२१ च्या या कालावधीत तो ३४०.३७ अब्ज युनिट होता. म्हणजेच २०२२ च्या या कालावधीत विजेचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.६ टक्के अधिक होता.

२०२२ च्या या कालावधीतील २१५. ८८ टक्क्यांवरून एप्रिल-जून २०२३ मध्ये जास्तीत जास्त पूर्ण केलेली वीज मागणी २२३. २३ गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल – जून २०२१ मध्ये ही आकडेवारी १९३. ९९ गिगावॅट होती.

अशाप्रकारे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीदरम्यान विजेच्या एका दिवसातील मागणीत अल्प वाढ नोंदवण्यात आली. उन्हाळ्यात देशातील विजेची मागणी २२९ गिगावॅटपर्यंत पोहोचेल, असा अंदाज ऊर्जा मंत्रालयाने याअगोदरच व्यक्त केला होता; परंतु अवकाळी पाऊस, बिपरजॉय चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे यंदा एप्रिल – जूनमध्ये अपेक्षित पातळी गाठता आलेली नाही.

पुरवठा खंडित होऊ नये म्हणून मंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. आयात कोळशावर आधारित वीज प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कोळशाची कमतरता भासू नये म्हणून आयात करण्याची सूचना करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe